AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर पीएफ खात्यात वारसाचे नाव कसे करावे अपडेट; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि नियम

जर तुमचे पीएफ खाते असेल तर लग्नानंतर त्यामध्ये नॉमिनीच्या नावात बदल करणे अनिवार्य आहे.  खातेधारकाच्या वारसाचे नाव अपडेट केल्यानंतर ईपीएफ कायद्यानुसार यापूर्वीच्या वारसदाराचे नाव आपोआप अपात्र होते. याविषयीच्या नियमात थोडेबहुत बदल आहेत. त्याची ही माहिती.

लग्नानंतर पीएफ खात्यात वारसाचे नाव कसे करावे अपडेट; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि नियम
पीपीएफ अकाऊंट
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 10:06 AM
Share

तुम्ही  पीएफ खातधारक असाल तर तुम्हाला वारसाचे नाव जोडणे अनिवार्य आहे.  खातेदारासोबत एखादी दुर्घटना घडल्यास या खात्याशी संबंधित लाभ त्याच्या वारसदारांना मिळतात.  जर तुमचे नवीन लग्न झाले असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पीएफ खात्यात नॉमिनी अपडेट करणे गरजेचे आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होते.  चला तर जाणून घेऊया वारसदाराचे नाव अपडेट करण्याची प्रक्रिया..

अशी आहे प्रक्रिया

सर्वात अगोदर EPFO च्या संकेतस्थळावर (website) जा. इथे लॉग-इन(Log-in) करा. View हा पर्याय निवडा.  त्यानंतर  प्रोफाइल (Profile) वर क्लिक (Click) करा याठिकाणी पीएफ खातेधारकांना (PF Account Holder)  यांची संपूर्ण माहिती असते.  ही पूर्ण माहिती एकदा नीट तपासा.  जर माहिती योग्य वाटत असेल तर मॅनेज (Manage) हा पर्याय निवडा.  त्यानंतर इ-नॉमिनेशन (e-nomination) या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा प्रोफाईल ओपन होईल आणि नवीन पेजवर तुम्हाला फॅमिली डिक्लेरेशन (Family Declaration) या कॉलमवर Yes अथवा No हा पर्याय देण्यात येईल.  Yes  पर्यायावर क्लिक करा त्यानंतर नवीन पेज ओपन होईल याठिकाणी ॲड फॅमिली डिटेल्स (Add Family Details) हा पर्याय देण्यात आलेला आहे.  या ठिकाणी तुमच्या वारसदाराचे आधारक्रमांक,  नाव,  जन्मतारीख,  लिंग, तुमच्या सोबतचं नातं,  पत्ता,  बँक खात्याची (Bank Details) संपूर्ण माहिती तसेच तुमच्या तुमच्या नॉमिनी चा फोटो इत्यादी माहिती जमा करा  आणि सेव (Save)  करा.  यासोबतच ईपीएस (EPS) म्हणजेच पेन्शनसाठी च्या पेजवरही तुम्हाला नॉमिनी ऍड(nominee add) करता येतो.  प्रॉव्हिडंट फंड स्कीम 1952 (Provident Fund Scheme 1952) च्या नियमानुसार लग्नानंतर ईपीएफ(EPF) यामध्ये नॉमिनी अपडेट (nominee update) केल्यानंतर यापूर्वीच्या वारसाची माहिती आपोआप डिलीट होईल.  डेलॉयट इंडियाचे भागीदार सरस्वती कस्तुरीरंगन यांनी माहिती दिली आहे की,  लग्नानंतर नवीन वारसाचे नाव ॲड झाल्यास जुने नोंदणीचे नाव आपोआप रद्द होते त्यासाठी ईपीएफओ खातेधारकाला नवीन वारसदाराची संपूर्ण  माहिती जमा करावी लागते.

स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळे नियम

एपीएफ (EPF)  कायद्यानुसार पीएफ पुरुष सदस्यांसाठी कुटुंबात सर्वात अगोदर पत्नी मुलं त्याच्यावर अवलंबून असलेले माता-पिता, मुलाच्या मृत्यू झाल्यास त्याची विधवा पत्नी आणि मुले यांचा समावेश होतो तर पीएफ महिला खातेदारांसाठी त्याच्या कुटुंबात पती, मुलं तिच्यावर अवलंबून असलेले तिचे आई-वडील,  पतीचे आई-वडील,  मुलं आणि मुलाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी आणि मुलगी यांचा समावेश होतो

इपीएस आणि ईपीएफ यासाठी वेगवेगळे नियम

EY India चे संचालक पुणे गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ईपीएस आणि ईपीएफ नॉमिनेशनसाठी नियम वेगवेगळे आहेत. भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये पत्नीसह  मुलं आणि आई-वडील यांची नोंदणी करता येते.  यामध्ये सर्वच भागीदार असतात. तर इपीएस मध्ये केवळ पत्नी आणि मुले यांना वारसदार नेमता येते.

इतर बातम्याः

शंभर दीडशे नाही, पावणे दोनशे कोटी सापडले, नोटा मोजायलाही 13 मशिन्स, कानपूरच्या रेडमध्ये नवं ‘शिखर’!

Crisis in Uttarakhand BJP|उत्तराखंडमध्ये भाजपची बोट हेलकावे का खातेय? दोन वजनदार मंत्री, 4 आमदारांनी पक्ष का सोडला?

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.