शंभर दीडशे नाही, पावणे दोनशे कोटी सापडले, नोटा मोजायलाही 13 मशिन्स, कानपूरच्या रेडमध्ये नवं ‘शिखर’!

शंभर दीडशे नाही, पावणे दोनशे कोटी सापडले, नोटा मोजायलाही 13 मशिन्स, कानपूरच्या रेडमध्ये नवं 'शिखर'!
पियूष जैन यांच्या घरात सापडलेलं घबाड

उत्तर प्रदेशातील शिखर पान मसाला मालक आणि समाजवादी पार्टीचे नेते पियूष जैन यांच्या घरी आणि कार्यालयावर काल आयकर विभागाने छापा टाकला. जैन यांच्या घरात नोटांनी खचाखच भरलेले कपाट सापडले. एवढं मोठं घबाड पाहून अधिकारीही चक्रावून गेले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Dec 25, 2021 | 9:48 AM

कानपूरः उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर आणि कनौजमधील शिखर पानमसाला व्यापारी पीयूष जैन (Piyush Jain) यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यात अफाट मोठ्ठं घबाड सापडलं. आयकर विभागाच्या मदतीने डीजीआय (जीएसटी इंटेलिजन्स महासंचलनालय) च्या टीमने या व्यापाऱ्याच्या घगरावर काल छापा (IT Raid) टाकला. इथे शंभर, दीडशे नव्हे तर तब्बल पावणे दोनशे कोटी कोटी रुपयांचा साठा सापडला. व्यापाऱ्याच्या घरातील कपाटांमध्ये रद्दी, कचरा भरावा त्याप्रमाणे खचाखच नोटा भरलेल्या आढळून आल्या. या नोटांची गणती अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी या व्यापाऱ्याच्या घराची झडती घेण्यात आली. पियूष जैन यांचे पुत्र प्रत्यूष आणि प्रियांश जैन यांना अटक करण्यात आली असून अधिकारी पुढील तपास करत आहे.

एवढी संपत्ती गोळा कुणी केली?

कानपूर आणि कनौज येथील परफ्यूम व्यापारी पियूष जैन यांच्या घरी अधिकाऱ्यांना नोटांचा हा खजिना सापडला. पियूष जैन हे शिखर पानमसाला आणि परफ्यूमचे व्यापारी असून ते समाजवादी पार्टीचे नेते आहेत. उत्तर प्रदेशाच्या इतिहासात, जीएसटीच्या छाप्यात प्रथमच एवढं मोठं घबाड सापडल्याचा दावा प्राप्तिकर विभागनं केला आहे. अधिकारी म्हणाले की, या जागेवर छापा मारल्यानंतर पियूष जैन यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे उघड झाले. सध्या पियूष जैन गायब आहेत. या छाप्यात 175 कोटी रोख रक्कम जप्त करण्यात आली. पियूष जैन यांच्या घरावरील जीएसटी इंटेलिजन्सची ही कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पियूष जैन यांच्या मागावरील पथकाच्या काही टीम कापपूर, कनौज आणि मुंबईतही छापेमारी करत आहेत. दरम्यान त्यांचे दोन पुत्र प्रत्यूष आणि प्रियांश जैन यांना कानपूरमधील आनंदपुरी येथील जैन निवास येथून अटक करण्यात आली. आयकर विभागाने या दोघांनाही कनौज येथील कारखान्यात नेले आणि तेथे रोख रक्कम आणि दस्तावेज तपासले गेले.

नोटांचं घबाड मोजण्यासाठी 13 मशीन मागवल्या

प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरमधील या रेडमध्ये सापडलेले पैसे नेण्यासाठी 80 पेट्यांचा बंदोबस्त करावा लागला. तसेच येथील नोटा मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या दोन शाखांमधून 13 मशीन मागवण्यात आल्या. नोटा भरण्यासाठी पेट्यांचीही ऑर्डर देण्यात आली. एवढा मोठा खजिना वाहून नेणेही जोखिमीचे होते. पोलीस आणि पीएसीच्या चोख बंदोबस्तात स्टेट बँकेच्या मालरोड शाखेत एका कंटेनरमध्ये या नोटांच्या पेट्या नेण्यात आल्या.

आणखी काही व्यापाऱ्यांच्या घरी छापे

प्राप्तिकर विभागाची या परिसरात छापेमारी आजही सुरूच आहे. पियूष जैन यांच्या घरात मिळालेल्या पुराव्यांनुसार, गणपती रोड कॅरि्र्सचे मालक प्रवीण जैन यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये रेड टाकण्यात आली. तेथून विभागाला 1.10 कोटी रुपये रोख मिळाले. प्रवीण जैन हे पियूष जैन यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे प्रवीण जैन यांच्या चौकशीतून उघड झाले. कनौज येथील होली मोहल्ला येथील संदीप मिश्रा यांच्या फर्मवरही छापेमारी झाली. संदीप मिश्रा हे पान मसाला आणि नमकीन बनवणाऱ्या कंपनीला परफ्यूम कंपाउंडचा पुरवठा करतात.

 भाजपच्या संबित पात्रांचा हल्लाबोल

समाजवादी पार्टीचे नेते आणि पियूष जैन यांच्या घरी एवढं मोठं घबाड सापडल्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी समाजवादी पार्टीवर चांगलंच तोंडसुख घेतलं. संबित पात्रा यांनी ट्विट केलं की, ‘”समाजवादियों का नारा है, जनता का पैसा हमारा है! समाजवादी पार्टी के कार्यालय में समाजवादी इत्र लॉन्च करने वाले पीयूष जैन के यहाँ GST के छापे में बरामद 100+ करोड़ कौन से समाजवाद की काली कमाई है?”

इतर बातम्या-

Winter Session : देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक प्रश्नाला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं उत्तर, वाचा सविस्तर

rane vs thackeray : नियम सगळ्यांना एकच, लक्षात असू दे…नक्कलीवरून नितेश राणेंचा पुन्हा इशारा


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें