rane vs thackeray : नियम सगळ्यांना एकच, लक्षात असू दे…नक्कलीवरून नितेश राणेंचा पुन्हा इशारा

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा देत नक्कल केली. त्यावरुन आता जोरदार राजकारण तापले आहे.

rane vs thackeray : नियम सगळ्यांना एकच, लक्षात असू दे...नक्कलीवरून नितेश राणेंचा पुन्हा इशारा
नितेश राणे, आमदार
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 9:36 PM

मुंबई : राज्यात सध्या नकला करण्यावरून राजकारण तापले आहे. याची सुरूवात झाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली, त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्या नकलेचा वाद थांबला नाही तोवर अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा देत नक्कल केली. त्यावरुन आता जोरदार राजकारण तापले आहे. नितेश राणे यांच्या नकलीला प्रत्युत्तर देत नवाब मलिक यांनी कोंबडीचा फोटो शेअर केला. त्यानंतर आता पुन्हा नितेश राणे यांनी आक्रमक ट्विट केले आहे.

नितेश राणे यांचे ट्विट काय?

”यांनी नक्कल केली तर ती ठाकरी भाषा, आम्ही केली तर संस्कृती चे धडे देणार. गेले ते दिवस…नियम सगळ्यांना एकच…लक्षात असुन दे!!!नाहीतर..परत meow meow आहेच !” असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे, त्यामुळे आता या म्याऊ म्याऊच्या घोषणा गाजताना दिसून येत आहेत. अधिवशनाच्या दुसऱ्या दिवशी तर या घोषणावरून गदारोळ झालाच मात्र आज तिसऱ्या दिवशीही हा वाद थांबलेला नाही, राणे आणि ठाकरे यांच्यातले वार-पलटवार सुरूच आहेत.

निलेश राणेंचीही मुख्यमंत्र्यांवर टीका

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले. पण 1 दिवससुद्धा घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

नवाब मलिक यांचे ट्विट काय

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केलाय. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधलाय. या फोटोकडे निट पाहिलं तर शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पैहचान कौन? असा खोचक सवालही केलाय. त्यामुळे या नकला आणि ट्विटरयुद्ध काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये.

Omicron : राज्यात ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण, नाताळ साधेपणाने साजरा करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Video | …जेव्हा हत्ती सोंडेनं त्याला म्हणाला, ‘Thanks यार! तुझ्यामुळे रस्ता क्रॉस करु शकलो’

क्रिप्टोकरन्सी व्हेल : मार्केटच्या किंमतीवर थेट परिणाम, वेळ स्ट्रॅटेजी बदलण्याची?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.