AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?

Delhi Capitals vs UP Warriorz Toss : यूपी वॉरियर्सच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्स एलिमिनेटरमध्ये पोहचणार की नाही? हे ठरणार आहे. तसेच दिल्लीलाही प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी यूपी विरुद्ध विजयी होणं बंधनकारक आहे.

WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?
WPL 2026 CaptainsImage Credit source: WPL X Account
| Updated on: Feb 01, 2026 | 7:44 PM
Share

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात (WPL 2026) साखळी फेरीतील 20 व्या आणि शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स आमनेसामने आहेत. हा सामना बडोद्यातील कोतांबीमधील बीसीए स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्स हीने बॉलिंगचा निर्णय घेत यूपीला बॅटिंगसाठी भाग पाडला आहे. या सामन्याच्या निकालावर 2 संघांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

डब्ल्यूपीएल स्पर्धेत 5 पैकी 3 संघ क्वालिफायरसाठी पात्र ठरतात. यंदा आरसीबीने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात थेट अंतिम फेरीत धडक दिलीय. तर गुजरात जायंट्सने टीमनेही क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. आता तिसऱ्या आणि अंतिम जागेसाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात थेट लढत आहे. दिल्लीने हा सामना जिंकल्यास ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरतील. मात्र युपीने विजय मिळवल्यास मुंबईचा फायदा होईल. युपीच्या विजयामुळे मुंबईला प्लेऑफचं तिकीट मिळेल. त्यामुळे युपीने जिंकावं, अशीच प्रार्थना मुंबईची असणार आहे.

युपीसाठी दिल्ली विरुद्धचा सामना औपचारिकता

युपीचं या मोसमातून आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे युपीसाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. मात्र युपीकडे हा सामना जिंकून मुंबईला मदत करण्यासह दिल्लीचा गेम करण्याची दुहेरी संधी आहे.

नेट रनरेट ठरणार गेम चेंजर!

मुंबईने या मोसमात एकूण 8 तर दिल्लीने 7 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. मात्र मुंबईचा दिल्लीच्या तुलनेत नेट रनरेट चांगला आहे. मुंबईचा नेट रनरेट हा +0.059 इतका आहे. तर दिल्लीचा नेट रनरेट हा -0.164 असा आहे. त्यामुळे जर युपीने दिल्लीला पराभूत केलं तर मुंबई 6 गुणांसह नेट रनरेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचेल. त्यामुळे या सामन्यातील प्रत्येक अपडेटकडे मुंबईकह चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

यूपी वॉरियर्स प्लेइंग ईलेव्हन : मेग लॅनिंग (कॅप्टन), सिमरन शेख, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, शिप्रा गिरी (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चार्ली नॉट, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय, शिखा पांडे आणि क्रांती गौड.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन: शफाली वर्मा, लिझेल ली (विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी आणि नंदनी शर्मा

Follow Us
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप