Skin Care for Men : पुरुषांनी त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यावी? फॉलो करा ‘या’ टिप्स

महिला आणि पुरुषांची त्वचा वेगळी असते. त्यामुळे दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे त्वचेची काळजी (Skin Care) घ्यावी लागते. अनेकदा त्वचेची काळजी न घेतल्याने पुरूषांना डाग, मुरुमे, ब्लॅक हेड्स, सुरकुत्या (Skin Problems) अशा समस्यांना सामोरं जावं लागतं.

Skin Care for Men : पुरुषांनी त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यावी? फॉलो करा 'या' टिप्स
Skin care for menImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 3:46 PM

जर तुम्हाला असे वाटत असेल की स्वच्छ आणि सुंदर त्वचा फक्त महिलांसाठी आवश्यक आहे तर तुम्ही चुकीचे आहात. कारण पुरुषांसाठी देखील स्वच्छ आणि चांगली त्वचा आवश्यक असते. महिलांप्रमाणेच पुरुषांनीही त्यांच्या त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पुरुषांनी वेळीच त्यांच्या त्वचेची काळजी घेतली नाही तर त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. महिला आपल्या त्वचेसाठी सजग असतात, परंतु पुरुषांनीही त्यांच्या त्वचेची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. महिला आणि पुरुषांची त्वचा वेगळी असते. त्यामुळे दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे त्वचेची काळजी (Skin Care) घ्यावी लागते. अनेकदा त्वचेची काळजी न घेतल्याने पुरूषांना डाग, मुरुमे, ब्लॅक हेड्स, सुरकुत्या (Skin Problems) अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी तुम्हाला काही स्किनकेअर टिप्स फॉलो कराव्या लागतील. या टिप्स फॉलो केल्यास तुमचा चेहरा आकर्षक आणि चमकदार होण्यास मदत होईल. (Skin Care Tips for Men)

  1. क्लींजिंग- क्लींजिंग हा स्किनकेअर रूटीनचा सर्वांत महत्वाचा भाग आहे. क्लींजिंगमुळे दिवसभरात त्वचेवर साचलेला मळ काढून टाकण्यास मदत होते. तुमच्या त्वचेला स्वच्छतेची खूप गरज असते. यासाठी तुमची त्वचा आठवड्यातून एकदा चांगल्या स्क्रबने एक्सफोलिएट करावी.
  2. शेव्हिंग टिप्स- शेव्हिंग करण्यापूर्वी शेव्हिंग जेल वापरा. साबणापेक्षा हा पर्याय अधिक चांगला आहे. तुमच्या त्वचेला थोडा ओलावा देण्यासाठी आफ्टरशेव्ह करायला विसरू नका. शक्यतो अल्कोहोल-आधारित आफ्टरशेव्ह टाळा.
  3. सनस्क्रीन- सनस्क्रीन हा रोजच्या वापरातील सर्वांत सामान्य प्रॉडक्ट आहे. त्वचेला युव्ही किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करू शकता. उन्हात जाण्याच्या 10 मिनिटं आधी चेहरा आणि मानेला सनस्क्रीन लावावा.
  4. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार स्कीनकेअर प्रॉडक्ट्स निवडा- पुरुष सहसा स्कीनकेअर प्रॉडक्ट्सची पर्वा करत नाहीत. मात्र त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मुरुम, लालसरपणा किंवा पुरळ यांसारख्या त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार स्कीनकेअर प्रॉडक्ट्स निवडा.
  5. आहार- निरोगी त्वचेसाठी सकस आहार घेणंही महत्त्वाचे आहे. त्वचेचं खोलवर पोषण करण्यासाठी त्याची मदत होते. या व्यतिरिक्त तजेलदार त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती फेस मास्क देखील वापरू शकता.

हेही वाचा:

कॉफीमध्ये ‘हे’ पदार्थ मिसळून हेअर मास्क बनवा, वापरा आणि केसांना चमकदार बनवा…

शरीरातील ही लक्षणे वाढत्या कोलेस्ट्रॉलची तर चिन्हे नाहीत? दुर्लक्ष करु नका, अताच सावध व्हा !

मजबूत केसांसाठी आहारात “या” पदार्थांचा करा समावेश, केसांच्या समस्या होतील दूर!

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.