
मुंबई : दररोज सकाळी नाष्टा करणं हे खूप गरजेचं असतं. डॉक्टर देखील प्रत्येकाला सकाळी नाष्टा करण्याचा सल्ला देतातच. जर सकाळी नाष्टा केला नाही तर अनेक शारीरिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. त्यामुळे सकाळच्या वेळी नाश्ता करणे खूप गरजेचे असते. तर बहुतेक लोक सकाळी नाष्टा करतातच, पण काही लोक आरोग्यदायी पदार्थ खात नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण आता काही असेही आरोग्यदायी पदार्थ आहेत जे शरीरासाठी चांगले नसतात.
सकाळी नाष्ट्यामध्ये कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे?
सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही रवा, बाजरी, गहू, नाचणी यांपासून बनवलेला दलिया खाऊ शकता. तसेच मुगडाळ आणि तांदळाची खिचडी देखील खाऊ शकता. त्याचबरोबर घरगुती आयुर्वेदिक स्मुदीचा देखील तुम्ही नाष्ट्यामध्ये समावेश करू शकता. असा हलका आणि पौष्टिक आहार तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून घेतला पाहिजे. यामुळे तुमची अनेक शारीरिक आजारांपासून सुटका होते.
1. ओट्स खाणे ठरू शकतं घातक – सकाळच्या वेळी नाष्टामध्ये बहुतेक लोक ओट्स, कॉन्फ्लेक्स मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. पण हेच ओट्स तुमच्या शरीराला घातक ठरू शकतात. नाष्टा मध्ये ओट्स खाल्ल्यानंतर पचनाची समस्या निर्माण होऊ शकते. ते शरीरात नीट पचत नाहीत त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते आणि आपल्या शरीरात विषारी पदार्थ देखील तयार होऊ शकतात, त्यामुळे ओट्स खाणे टाळावे.
2. फळ आणि दूध एकावेळी घेणे चुकीचे – बहुतेक लोक सकाळी नाष्टा करताना फळ आणि दुधाचे सेवन करताना दिसतात. तर काही लोक फळांमध्ये दूध मिसळून पितात. पण फळाचे आणि दुधाचे हेच मिश्रण तुमच्या शरीराला हानिकारक ठरू शकते. आणि दुधाचे मिश्रण हे पोटासाठी जड असते. त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे फळ आणि दुधाचे सेवन एकाच वेळी करू नका.
3. थंड पदार्थांचं सेवन करू नका – सकाळच्या वेळी थंड पदार्थांचे सेवन करणं घातक ठरू शकते. बहुतेक लोक सकाळच्या वेळी थंड स्मुदी किंवा फळांचा रस पितात. पण हेच थंड पदार्थ पिल्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. पचनाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सकाळी फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किंवा थंड पेय पिणे टाळावे.