Yogurt in Winters: हिवाळ्यात दही खावे की नाही? तुमच्या मनातही आहे शंका तर वाचा

| Updated on: Dec 07, 2022 | 5:43 PM

थंडीत दही खावे की नाही याबाबत तुमच्या मनात देखील शंका असेल. तर चला आज आम्ही तुमची शंका दूर करतो.

Yogurt in Winters: हिवाळ्यात दही खावे की नाही? तुमच्या मनातही आहे शंका तर वाचा
Follow us on

Yogurt in Winters : दही आरोग्यासाठी चांगले मानले जाते. अनेक जण दही खाण्याचा सल्ला देतात. दही हे सुपरफूड मानले जाते. दहीमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन आणि मिनरल्स असतात. दहीपासून बनवलं जाणारं ताक देखील अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. जेवणाची चव आणखी वाढवण्यासाठी दही मदत करतं. यामुळे पचनक्रिया चांगली होते. पण आता हिवाळा सुरु झालाय. काही जण हिवाळ्यात आंबट न खाण्याचा सल्ला देतात. थंडीत दही खावे की नाही याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

थंडीत दही खाल्ल्याने कफ होतो का?

दही एक परफेक्ट फूड आहे. त्यामुळे ते हिवाळ्यात देखील खाता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये प्रोबायोटिक आणि विटामिन असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तुम्ही दही खावू शकता. फक्त ते थंड नसावे याची काळजी घ्या.

रात्री दही खावू शकतो का?

जेवत असताना देखील दही खाता येतं. दहीत अमिनो एसिड असतं. जे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असके. रात्री जेवताना देखील तुम्ही दहीचं सेवन करु शकता.

बाळाला दूध पाजणाऱ्या आईने दही खावे का?

हिवाळ्यात बाळाला दूध पाजणाऱ्या आईन दहीचं सेवन करावे की नाही याबाबत देखील अनेकांना शंका आहे. पण यावर तज्ज्ञ सांगतात की, दही खाल्ल्याने आई किंवा बाळाला कफ होण्याची शक्यता नसते. दहीमधून अॅक्टीव्ह बॅक्टेरीया मिळतात. जे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.