एक उपाय आणि तुमची सिगारेट ओढण्याची समस्या कायमची बंद, जाणून घ्या रामबाण उपाय…

बरेच लोक नैसर्गिक पद्धतींऐवजी तात्पुरत्या पद्धतींनी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते यशस्वी होत नाहीत. धुम्रपानाचं व्यसन सोडण्याचे काही सोपे मार्ग आहेत. या सर्व पद्धती तुम्हाला या सवयीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात.

एक उपाय आणि तुमची सिगारेट ओढण्याची समस्या कायमची बंद, जाणून घ्या रामबाण उपाय...
सिगारेट
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 3:11 PM

मुंबई : सध्या तरूणाई (Youth) व्यसनांच्या (Addiction) आहारी जाताना दिसतेय. अनेकजण सिगारेटच्या (Smoking) आहारी गेलेले दिसतात. अनेकदा इच्छा असतानाही त्यांना या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. अश्यावेळी डिप्रेशन (Depression) येतं. पण हे येणारं डिप्रेशन टाळण्यासाठी आणि व्यसनातून मुक्तता करण्यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही यातून सहजासहजी बाहेर पडू शकता. आयुर्वेदात (Ayurveda) याबाबतीत उल्लेख आढळतो. धुम्रपानाचं मुख्य कारण म्हणजे वात, पित्त आणि कफ या तीन दोषांपैकी कोणत्याही एकामुळे येणारा मानसिक ताण. बरेच लोक नैसर्गिक पद्धतींऐवजी तात्पुरत्या पद्धतींनी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते यशस्वी होत नाहीत. धुम्रपानाचं व्यसन सोडण्याचे काही सोपे मार्ग आहेत. या सर्व पद्धती तुम्हाला या सवयीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात.

नेती क्रिया करणे

एका रिपोर्टनुससार, नेती क्रिया केल्याने धुम्रपानाची समस्या दूर होऊ शकते. डोक्याच्या आतील वायुमार्ग साफ करण्याची नेती क्रिया केली जाते. सिगारेट ओढण्याची सवय सोडण्यासाठी क्षारयुक्त पाणी प्रभावी ठरते. हे खारट पाणी एका नाकपुडीतून आत टाका आणि दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर सोडा. हिच प्रक्रिया उलट करा.याने तुम्हाला फरक जाणवेल. याशिवाय दररोज सकाळी तुळशीची 2 ते 3 पानं चावून खाल्यानेही फरक जाणवतो.यामुळे व्यसन हळूहळू कमी होईल. तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यानेही फरक जाणवतो.यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. शिवाय धुम्रपान करण्याची इच्छा होत नाही.

अनेकजण सिगारेटच्या आहारी गेलेले दिसतात. अनेकदा त्यांना इच्छा असतानाही त्यांना या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. अश्यावेळी डिप्रेशन येतं. व्यसनाधिनता ही भारतासोबतच संपूर्ण जगासमोरची मोठी समस्या आहे. धुम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका, हाय ब्लड प्रेशर, कर्करोगही होतो. जेव्हा हे व्यसन सोडायची वेळ येते तेव्हा लोकांना सहजासहजी हे शक्य होत नाही. तुम्ही वरील उपाय करून यातून सहजासहजी बाहेर पडू शकता.

टीप- हा उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या…

संबंधित बातम्या

Ginger For Dandruff : आल्याच्या वापराने कोंड्याच्या समस्येपासून सुटका करा, फक्त हे तीन उपाय आणि कोंडा गायब…

Health Tips : उन्हाळ्याच्या दिवसात या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, शरिरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवा…

Hair Tips : पांढऱ्या केसांवर पेरूच्या पानांचा वापर करा, काळे आणि चमकदार केस मिळवा…