45 वर्षीय करोडपती महिलेने 14 वर्षीय मुलासोबत ठेवले संबंध, आता खातेय जेलची हवा, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Jul 27, 2022 | 7:03 PM

सवानावर एका अल्पवयीन मुलासोबत अवैध संबंध असल्याचा आरोप आहे. सवानाला 27 जून रोजी चाइल्ड अब्यूज युनिटने अटक केली होती. तेव्हापासून ती तुरुंगात होती.

45 वर्षीय करोडपती महिलेने 14 वर्षीय मुलासोबत ठेवले संबंध, आता खातेय जेलची हवा, नेमकं प्रकरण काय?
45 वर्षीय करोडपती महिलेने 14 वर्षीय मुलासोबत ठेवले संबंध, आता खातेय जेलची हवा, नेमकं प्रकरण काय?
Image Credit source: tv9
Follow us on

ऑस्ट्रेलिया : एका करोडपती महिलेने (Australian women) एका 14 वर्षांच्या मुलासोबत शाररिक संबंध ठेवल्याचा (Physical Relationship) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे करत असताना ती दारूच्या नशेत (Drunk) होती असेही पोलीस तपासात समोर आले आहे. महिलेने या मुलाला गप्प बसण्याची धमकीही दिली होती. ही घटना या मुलाने आईला सांगितल्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. हे धक्कादायक प्रकरण ऑस्ट्रेलियातील आहे. उद्योजक सवाना डेस्ले (45) हीला गंभीर आरोपानंतर जूनमध्ये अटक करण्यात आली होती. ती सुप्रसिद्ध घोडा ब्रीडर रॉस डेस्ली यांची मुलगी आहे. सवानावर एका अल्पवयीन मुलासोबत अवैध संबंध असल्याचा आरोप आहे. सवानाला 27 जून रोजी चाइल्ड अब्यूज युनिटने अटक केली होती. तेव्हापासून ती तुरुंगात होती. त्यादरम्यानही काही खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत.

पोलिसांनी चतुराईने बिंग फोडलं

या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही महत्वाची राहिली आहे. कारण पोलिसांनी सवानाचा फोनही टॅप केला होता. त्यात सवानाने या किशोरवयीन मुलाला गप्प राहण्याची धमकीही दिली होती, तर पोलिसांना फसवण्यासाठी दोघांमधील संबंध परस्पर मान्य असल्याचेही सांगितले होते, ही सर्व माहिती पोलिसांच्या हाती लागताच पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी हे सर्व पुरावे कोर्टात सादर करत तिच्या जामीनाला विरोध केला होता. मात्र त्याचा फार काही उपयोग झाला नाही.

कोर्टात नेमकं काय घडलं?

तुरुंगात असलेल्या सवानाला जेव्हा कोर्टात हजर केलं, तेव्हा तिने तिची कैफियत मांडली आणि सांगितले की तिचेकरोडो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच तिच्या आईला देखील कॅन्सर देखील आहे. न्यायालयाने महिलेच्या वकिलाची बाजू ऐकून घेत जामीन तिला मंजूर केला आहे. अलिकडेच तिला 25 जुलै रोजी डाऊनिंग सेंटर स्थानिक न्यायालयात (सिडनी, ऑस्ट्रेलिया) हजर करण्यात आले. सावनाची मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याचा दावा वकिलाने केला. त्याचवेळी वकिलाने या कालावधीत जामीनासाठी 79 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आणि शेवटी तिला जामीन मिळाला.

अनेकदा लहान मुलं बोलत नाहीत

अशी धक्कादाय प्रकरण आपल्याला सोशल मीडियावर वारंवार पाहायला मिळतात. अनेकदा बदनामीच्या आणि घरच्यांच्या भितीने मुलं आपल्या मनातील गोष्टी बोलत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींना खतपाणी घातलं जातं. या प्रकरणाने पुन्हा एकदा लहान मुलं आणि मोठ्यांमधील दरी दाखवून दिली आहे. या प्रकरणावर जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.