अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले; गेल्या महिन्यातच काबूलच्या गुरुद्वारावरही झाला होता हल्ला; हिंदू समुदाय भीतीच्या छायेखाली

इंडियन वर्ल्ड फोरमच्या अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी सांगितले की, गुरुद्वारमध्ये शीख आणि हिंदू समाजातील लोक होते, मात्र ते सुरक्षित आहेत. या घटनेचा आता एक व्हिडिओही समोर आला आहे.

अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले; गेल्या महिन्यातच काबूलच्या गुरुद्वारावरही झाला होता हल्ला; हिंदू समुदाय भीतीच्या छायेखाली
महादेव कांबळे

|

Jul 27, 2022 | 4:27 PM

नवी दिल्लीः अफगाणिस्तानातील (Afghanistan) काबूलमधील (Kabul ) कर्ते परवान गुरुद्वाराजवळ आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाल्याने गुरुद्वार पुन्हा एकदा हादरले आहे. गुरुद्वाराच्या मुख्य गेटजवळ बॉम्बस्फोट (Bomb blast) झाला असून गेल्या महिन्यातही याच गुरुद्वाराला लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या हिंदू नागरिकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानात तालिबानी सरकार आल्यापासून हे प्रकार वाढले असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. बॉम्बस्फोट होत असल्याने येथील हिंदू आणि शीख समुदायातील नागरिकांनी आता भारताचा रस्ता धरला आहे मागील काही दिवसांपासून अफगानिस्थानातून अनेक लोक भारतात आले आहेत.

महिन्याभरापूर्वीही गुरुद्वारवर हल्ला

काबूलमधील कर्ते परवान गुरुद्वाराच्या मुख्य गेटजवळ हा बॉम्बस्फोट झाला असून गेल्या महिन्यात 18 जून रोजी या गुरुद्वारावरच बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी त्यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

व्हिडीओ व्हायरल

यावर इंडियन वर्ल्ड फोरमच्या अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी सांगितले की, गुरुद्वारमध्ये शीख आणि हिंदू समाजातील लोक होते, मात्र ते सुरक्षित आहेत. या घटनेचा आता एक व्हिडिओही समोर आला आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार

ऑगस्ट 2021 पासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यापासून शीख समुदायाबरोबरच इतर अल्पसंख्याक समुदायांवरही याठिकाणी हल्ले वाढले आहेत. तालिबानच्या हल्ल्यापूर्वीही अफगाणिस्तानमध्ये 600 हिंदू आणि शीख समुदायाची लोकं राहत होती. मात्र तालिबान सरकार आल्यापासून ही संख्या आणखीनच घसरली आहे. त्यामुळे तेथून अनेक लोक भारतात परतू लागले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें