भारताकडे मोठी शक्ती, फक्त तोच युद्धविराम घडवून आणू शकतो, थेट या देशाने केली मोठी विनंती..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता अनेक देश पुढे येत आहेत. यादरम्यानच भारताकडे एका देशाने अत्यंत मोठी मागणी केली. ही मागणी युक्रेन रशिया युद्धाबाबत आहे. भारतातच ती ताकद असल्याचे थेट सांगण्यात आले.

भारताकडे मोठी शक्ती, फक्त तोच युद्धविराम घडवून आणू शकतो, थेट या देशाने केली मोठी विनंती..
PM modi
| Updated on: May 21, 2026 | 1:53 PM

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या 4 वर्षापेक्षाही अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. परिस्थिती तणावात आहे. दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. अमेरिकेने या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अजिबात यश मिळाले नाही. हेच नाही तर रशियाला घेरण्याकरिता अमेरिकेने थेट रशियाच्या तेलावर बंदी आणली. तरीही रशिया हार मानत नाही. इराण आणि अमेरिका युद्धासोबतच रशिया आणि युक्रेन यांच्यातीलही युद्ध थांबायला हवे, ही जगाची इच्छा आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात मोठे नुकसान होत आहे. आता थेट रशिया आणि युक्रेन युद्ध फक्त भारतच थांबू शकतो, असे मोठे विधान एका देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केले. जगाला आता फक्त भारताकडूनच मोठी आशा आहे. भारतात ती ताकद आहे जे रशिया आणि युक्रेन युद्ध थांबू शकतो, असेही त्यांनी म्हटले.

सर्वात मोठे कारण म्हणजे भारत आणि रशियात अत्यंत खास संबंध आहेत. रशिया कधीच भारताच्या शब्दापुढे जाणार नाही, हे जगाला ठावूक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यात अत्यंत खास मैत्री आहे. एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गस साकना यांनी म्हटले की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्याकरिता रशियावर फक्त भारतच दबाव आणू शकतो.

दोन्ही देशात भारत युद्धविराम करू शकतो. त्यांनी म्हटले की, रशियाच्या अध्यक्षांनी आता युद्धविराम करण्याबाबत विचार केला पाहिजे. साकना यांनी म्हटले की, एस्टोनिया 2027 मध्ये युक्रेन पुननिर्मित संमेलन आयोजित करत आहे. यात भारतही सहभागी होऊ शकतो. एएनआयसोबत बोलताना एस्टोनियाई परराष्ट्र मंत्री मार्गस साकना यांनी म्हटले की, युरोपला आता लवकरात लवकर शांतता हवी आहे.

पण रशिया याबाबत काहीच संकेत देत नाहीये. अशात भारताचा हस्तक्षेप खूप महत्वाचा ठरू शकतो. भारत रशियावर युद्ध थांबवण्याकरिता दबाव आणू शकतो. आम्हाला आशा आहे की, पुतिन लवकरच निर्णय घेतील आणि शांततेचा मार्गाने चालतील. भारत खरोखरच युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात मध्यस्थी करणार हा हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us