AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांना दणका, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत होऊ शकते घोषणा, दिल्लीत थेट बैठक..

LPG Price : इराण आणि अमेरिका युद्धात मोठा फटका बसताना दिसत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. आज एलपीजीबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.

सर्वसामान्यांना दणका, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत होऊ शकते घोषणा, दिल्लीत थेट बैठक..
LPG Price
| Updated on: May 21, 2026 | 9:44 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती भयंकर आहे. कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत सातत्याने वाढत आहेत. त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा देखील आहे. राज्यात एक महिना पुरेस इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा शिल्लक आहे. काही भागात पेट्रोल आणि डिझेलकरिता मोठ्या रांगा पेट्रोल पंपाबाहेर लागल्या आहेत. इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारतात बघायला मिळत आहे. दोनदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. महागाईमध्ये मोठी वाढ झाली.  15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी आणि त्यानंतर 19 मे रोजी 90 पैशांनी दरवाढ करण्यात आली. दुसरीकडे एलपीजी गॅसच्याही किमती वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. एलपीजी गॅसचाही मोठा तुटवडा या युद्धामुळे झाला. व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ सरकारकडून अगोदरच करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कधीही वाढ होऊ शकते.

मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या कितमीमध्ये 60 रुपयांची वाढ करण्यात करण्यात आली होती. इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ होत असताना सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणीतीही वाढ केली नाही. आता आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडत आहे, या बैठकीत एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीबद्दल निर्णय होऊ शकतो.

कोणत्याही क्षणी एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाने प्रति बॅरल 109 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अंदाजे 3.90 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर घरगुती एलपीजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई आणि वाढत्या इंधन दरांवर चर्चा होऊ शकते.

जर पुढील काही दिवसात इराण आणि अमेरिका युद्ध थांबले नाही तर परिस्थिती अधिक बिकड होऊ शकते. जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमती गगणाला पोहोचताना दिसत आहेत. शिवाय होर्मुज खाडीही बंद आहे. काही दिवस पुरेल इतकाच भारताकडे पेट्रोल आणि डिझेलचा साठा शिल्लक आहे. यादरम्यानच भारत सरकारकडून मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार