
Pakistan And Afghanistan Clash : पाकिस्तान हा असा देश आहे जो नेमहीच काहीतरी कुरापती काढत असतो. पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध कमालीचे ताणलेले आहेत. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धदेखील झालेले आहे. दरम्यान, आता हाच पाकिस्तान अफगाणिस्तान या देशाशी भिडला आहे. सध्या या दोन्ही देशांत कमालीचा संघर्ष चालू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत असून दोन्ही बाजूचे सैनिक मारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान-पाकिस्तान या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये संघर्षाची स्थिती का निर्माण झाली? हे दोन्हीही मुस्लीम देश असले तरी ते एकमेकांवर हल्ले का करत आहेत? या दोन्ही देशांच्या संघर्षाचा इतिहास काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या… सध्या दोन्ही देशांतील संघर्षाची स्थिती काय आहे? अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संघर्ष अजूनही सुरूच आहे. हा तणाव अजूनही निवळलेला नाही. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारच्या दाव्यानुसार सध्याच्या संघर्षात तालिबानी फौजांनी पाकिस्तानच्या 58 सैनिकांना ठार...