Afghanistan Crisis : नवा राष्ट्रपती थेट देशाचं नाव बदलण्याची चिन्हं, अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?

| Updated on: Aug 16, 2021 | 9:31 AM

तालिबानच्या (Taliban) ताब्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) हे आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह देश सोडून गेले. त्यामुळे आता तालिबनाचा महत्त्वाचा नेता असलेला मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Abdul Ghani Baradar) हा नवा राष्ट्रपती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

Afghanistan Crisis : नवा राष्ट्रपती थेट देशाचं नाव बदलण्याची चिन्हं, अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?
taliban in afghanistan
Follow us on

काबूल : तालिबानने ताबा मिळवल्यानंतर धगधगत असलेल्या अफगाणिस्तानवर जगाच्या (Afghanistan Crisis) नजरा लागल्या आहेत. तालिबानच्या (Taliban) ताब्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) हे आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह देश सोडून गेले. त्यामुळे आता तालिबनाचा महत्त्वाचा नेता असलेला मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Abdul Ghani Baradar) हा नवा राष्ट्रपती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे नवा राष्ट्रपती थेट अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान’ हे नवं नाव देऊ शकतो.

अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही आठवड्यातच तालिबानने सक्रीय होत, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. यानंतर सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत. ते ताजकिस्तानला पोहोचलेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतायत.

दुसरीकडे अनेक शहरांचे गव्हर्नर यांनी स्वत:हून आत्मसमर्पण केल्याने मोठा संघर्ष टळला. यादरम्यान काबूलमध्ये सध्या असलेल्या अनेक देशांच्या राजदुतांनी आपआपल्या नागरिकांना तातडीने देश कसा सोडता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले.

अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?

– अफगाणिस्तानात संघर्ष सुरु असताना तिकडे अमेरिकेत राजकीय वाद सुरु झाला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य हटवल्याने हा वाद उफाळल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडन यांना जबाबदार धरत, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

– अफगाणिस्तानातून पळाल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. देशातील रक्तपात रोखण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं असं अशरफ गनी म्हणाले.

– तिकडे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करजई यांनी व्हिडीओ पोस्ट करुन, आपल्या समर्थकांना काबूलमध्येच राहण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या सैन्य मोहिमेनंतर 2001 मध्ये करजई हे अफगाणिस्तानचे अध्यक्ष बनले होते.

– काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सर्व व्यावसायिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. इथून केवळ सैन्याच्या विमानांनाच परवानगी देण्यात आली आहे.

– तालिबानने यापूर्वीच दावा केला आहे की काबूलमध्ये राष्ट्रपती भवनचा ताबा आपण घेतला आहे. यानंतर काही तासांनी अल जजीराने एक व्हिडीओ जारी करुन तालिबानी सैन्य राष्ट्रपती भवनात असल्याचं म्हटलं होतं.

– अमेरिकेने आपलं अफगाणिस्तानातील दुतावास काबूल विमानतळावर हलवलं आहे. दुतावासावरील झेंडाही उतरुन एअरपोर्टकडे नेण्यात आला.

– अफगाणिस्तानचे कार्यवाद गृहमंत्री अब्दुल सत्तार मीरजकवाल यांनी सांगितल्यानुसार, सत्तेचं हस्तांतरण शांततेत होईल. काबूलवर कोणताही हल्ला होणार नाही.

– भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी आणि उपराष्ट्रपती अमीरुल्लाह सालेह देश सोडून निघून गेले.

VIDEO : 

संबंधित बातम्या  

Taliban Income: तालिबानची वार्षिक कमाई 1, 11, 32, 55, 00, 000 रुपयांपेक्षा जास्त, कोण हत्यार पुरवतं, पैसा कसा मिळवला जातो, संपूर्ण माहिती

कोण आहे मुल्ला बरादर ज्याचं अफगाण राष्ट्रपती म्हणून नाव घेतलं जातंय? आताचा राष्ट्रपती नेमका कुठे पळाला?