अफगाणिस्तानचे बग्राम हवाईतळ भारताच्या ताब्यात? पाकिस्तानला झटका, फोटोसह…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानच्या बग्राम हवाईतळावर दावा केला होता. आता अफगाणिस्तानने हे हवाईतळ भारताच्या ताब्यात दिल्याचे सांगितले जातंय. याचे काही फोटोही पुढे येत आहेत.

अफगाणिस्तानचे बग्राम हवाईतळ भारताच्या ताब्यात? पाकिस्तानला झटका, फोटोसह...
Bagram airbase
| Updated on: Oct 30, 2025 | 1:51 PM

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून चांगली राहिली आहेत. मात्र, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव बघायला मिळतोय. भारताला ताजिकिस्तानमधील आपले हवाईतळ बंद करावे लागलंय, रिपोर्टनुसार, ताजिकिस्तानवर पाकिस्तानसह तुर्की आणि कतारचा मोठा दबाव होता. शेवटी भारताने माघार घेतली असून आता एक चर्चा जोरदार रंगताना दिसतंय की, अफगाणिस्तानने त्यांचे हवाईतळ ज्याच्यावर अमेरिका दावा करतंय ते बग्राम हवाईतळ भारताकडे सोपवले आहे. यानंतर पाकिस्तानचा जळफळाट उठलाय. हेच नाही तर काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बग्राम हवाईतळावर अमेरिकेचा ताबा होता. मात्र, त्यांनी ते अफगाणिस्तानला सोपवले. आता त्यावर दावा करताना अनेकदा डोनाल्ड ट्रम्प दिसले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, अफगाणिस्तानने त्यांचे बग्राम हवाईतळ अमेरिकेकडे दिले पाहिजे. मात्र, अफगाणिस्तानमधून याला जोरदार विरोध केला जातोय. खरोखरच अफगाणिस्तानने त्यांचे हे हवाईतळ भारताकडे दिले का? याबद्दल जाणून घेऊयात अत्यंत मोठी आणि महत्वाची माहिती. बग्राम हवाईतळ भारताच्या ताब्यात असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताना दिसंतय.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले की, अफगाणिस्तानने बग्राम हवाईतळ भारताला सोपवले आहे. भारतीय तांत्रिक पथकाने भेट दिली आहे, काही गोष्टींची तपासणी भारताकडून केली जातंय. काम देखील सुरू करण्यात आलंय. पाकिस्तानने कतार आणि सौदी अरेबियाच्या माध्यमातून ताजिकिस्तानवर भारताचा हवाईतळ बंद करण्यासाठी दबाव आणला.

त्यानंतर अफगाणिस्ताने भारतासाठी दरवाजे उघडले केल्याचा दावा केला जात आहे. रिपोर्टनुसार, भारत आता ताजिकिस्तानमधील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला आयनी हवाईतळ चालवत नाही. 2002 पासून भारताने या हवाईतळाचा विकास आणि संचालन करण्यास मदत केली होती. बग्राम एअरबेस भारताला देण्याच्या तालिबानच्या दाव्यांना पुष्टी मिळालेली नाही. भारत सरकारकडून यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य देखील करण्यात आले नाहीये. जोपर्यंत भारत सरकारकडून काही भूमिका जाहीर केली जात नाही, तोपर्यंत खरोखर बग्राम हवाईतळावर भारताने ताबा घेतला का हे सांगणे कठीण आहे.