AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Afghanistan: सैन्य परत बोलावणं हे अमेरिकेचं सर्वात मोठं अपयश, US आर्मीच्या टॉप कमांडरकडून बायडन यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्हं

20 वर्षांच्या युद्धानंतर अफगाणिस्तानातून परतणं हे सामरिक अपयश असल्याचं म्हणणं या अधिकाऱ्याने मांडलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तालिबानला (Taliban) काबुलवर ताबा मिळवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेने (US) काही हजार सैनिकांना तिथं तैनात ठेवणं गरजेचं होतं.

Afghanistan: सैन्य परत बोलावणं हे अमेरिकेचं सर्वात मोठं अपयश, US आर्मीच्या टॉप कमांडरकडून बायडन यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्हं
मिले यांच्या मते हे अमेरिकेचं सामरिक अपयश आहे. कारण, अफगाणिस्तानातून तालिबानला हकलवून लावण्यासाठी अमेरिकेच्या तब्बल 2461 सैनिकांनी आपले प्राण दिले आहेत.
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 12:56 PM
Share

वॉशिंग्टन: अफगाणिस्तानातून (Afghanistan) सैन्य परत बोलावणं हे अमेरिकेचं अपयश असल्याची साक्ष अमेरिकन काँग्रेसमध्ये अमेरिकेच्या (US Congress) एका उच्च सैनिकी अधिकाऱ्याने दिली आहे. 20 वर्षांच्या युद्धानंतर अफगाणिस्तानातून परतणं हे सामरिक अपयश असल्याचं म्हणणं या अधिकाऱ्याने मांडलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तालिबानला (Taliban) काबुलवर ताबा मिळवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेने (US) काही हजार सैनिकांना तिथं तैनात ठेवणं गरजेचं होतं. ( top us commander calls afghan war a big strategic failure to us congress Afghanistan Taliban )

ज्वाईंट चिफ ऑफ स्टाफ चे प्रमुख जनरल मार्क मिले यांनी हे सांगितलं नाही की त्यांनी राष्ट्रपती जो बायडन यांना काय सल्ला दिला होता, जेव्हा अफगाणिस्तानातून सैन्य परत बोलवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

अफगाणिस्तानात सैनिक तैनात ठेवण्याची गरज

जनरल मिले यांनी सिनेटच्या सशस्र सेवा समितीपुढं सांगितलं की, माझ्या मते, काबुलमध्ये सरकार पडण्यापासून वाचवण्यासाठी आणि तालिबानला अफगाणिस्तानात रोखण्यासाठी अमेरिकेने कमीत कमी 2500 सैनिक अफगाणिस्तानात तैनात ठेवणं गरजेचं होतं. मिले यांच्या मते हे अमेरिकेचं सामरिक अपयश आहे. कारण, अफगाणिस्तानातून तालिबानला हकलवून लावण्यासाठी अमेरिकेच्या तब्बल 2461 सैनिकांनी आपले प्राण दिले आहेत. मात्र असं असतानाही 15 ऑगस्टला तालिबानने सहजरित्या काबुलवर ताबा मिळवला. मिले म्हणाले की, आता काबुलवर शत्रूचं राज्य आलं आहे. हेच नाही तर अफगाणिस्तानच्या सैन्याला आत्मनिर्भर करण्याऐवजी अमेरिकेने त्यांना स्वत:वर निर्भर राहण्यास मजबूर केलं. नाहीतर आज चित्र काही वेगळं असतं.

राष्ट्रपती बायडन यांना काय सल्ला दिला?

अमेरिकेच्या मध्य कमांडचे प्रमुख आणि अफगाणिस्तान युद्धात शेवटच्या महिन्यात नजर ठेऊन असणारे जनरल फ्रँक मॅकेंजीसु्द्धा मिले यांच्या मताशी सहमत आहेत. मात्र, त्यांनी हे सांगण्यास नकार दिला की, त्यांनी राष्ट्रपती जो बायडन यांना काय सल्ला दिला होता. सिनेटर टॉम कॉटन यांनी यावर प्रतिप्रश्न केला की, जर तुमचा सल्ला राष्ट्रपतींनी मानला नाही तर मग तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा का नाही दिला? त्यावर मिले म्हणाले की, हे गरजेचं नाही की राष्ट्रपती आमच्या प्रत्येक सल्ल्यावर सहमत असतील. ते स्वत: निर्णय घेऊ शकतात आणि सैन्य अधिकारी म्हणून फक्त या कारणासाठी राजीनामा देणं, की माझा सल्ला ऐकला नाही. ही गोष्ट चुकीची आहे.

संरक्षणमंत्री ऑस्टिन यांचीही साक्ष

या समितीसमोर संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनीही साक्ष दिली. ते म्हणाले की सैन्याने विमानांच्या मदतीने लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढलं. कारण, अफगाणिस्तानचं भविष्यच जर अंधारात असेल तर तिथं राहून काही फायदा नाही. ते म्हणाले की, आम्ही एक राज्य बनवण्यासाठी मदत केली, पण आम्ही एख राष्ट्र उभं करु शकलो नाही. त्यांच्या मते, ज्या अफगाणी सैन्याला आम्ही प्रशिक्षण दिलं, त्या अफगाण सैन्याने अगदी सहजपणे तालिबानसमोर शस्र टाकली, हे सगळं आमच्यासाठी धक्कादायक होतं.

ऑस्टिन यांनी हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 14 ऑगस्टपासून सुरू झालेल्या इव्ह्वाकुशन ऑपरेशनमधील उणीवा मान्य केल्या. हेच नाही तर, ते म्हणाले की विमानाद्वारे लोकांचं स्थलांतर करणं ही एक ऐतिहासिक कामगिरी होती, अमेरिकेने तालिबानच्या अधिपत्याखालील अफगाणिस्तानातून तब्बल 124,000 लोकांना बाहेर काढलं.

हेही वाचा:

Pakistan Blasphemy Case: पाकिस्तानात शाळेची मुख्याध्यापिका ईशनिंदा कायद्याची शिकार, कोर्टाकडून फाशीची शिक्षा

ग्राहकाची दाढी कापली, ट्रीम केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, तालिबान्यांचा सलून चालकांना फतवा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.