AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : ऑस्ट्रेलियानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या भूमीमध्ये पोहोचण्याआधीच तिथून आली गुड न्यूज

PM Narendra Modi : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. यात इंडोनेशियाचा दौरा संपवून मोदी आज ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. या दोन्ही देशांच्या दौऱ्यावर महत्वाचे करार झाले. आता मोदी न्यूझीलंडमध्ये जाण्याआधीच तिथून गुड न्यूज आली आहे.

PM Narendra Modi : ऑस्ट्रेलियानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या भूमीमध्ये पोहोचण्याआधीच तिथून आली गुड न्यूज
India-New zealand
| Updated on: Jul 09, 2026 | 4:38 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 आणि 11 जुलै रोजी न्यूझीलंडच्या महत्वाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा काही सामान्य दौरा नाही. चार दशकानंतर कुठला भारतीय पंतप्रधान न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहे. या ऐतिहासिक दौऱ्याआधी एक चांगली बातमी आली आहे. नव्या व्यापार करारानुसार भारताची 57 टक्के निर्यात पूर्णपणे टॅक्स फ्री होणार आहे. याचा परिणाम दोन्ही देशांची बाजारपेठ, तिथे काम करणारे लोक आणि ग्राहकांवर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी निमंत्रित केलं होतं. लक्सन यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मोदींचं स्वागत करताना आनंद व्यक्त केला आहे.

भारत जगातील एक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. न्यूझीलंडच्या प्रगतीसाठी भारताची साथ गरजेची आहे असं लक्सन म्हणाले. एप्रिल महिन्यात दोन्ही देशांनी फ्री ट्रेड एग्रीमेंटवर स्वाक्षरी केली होती. आता तो करार प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. या ऐतिहासिक दौऱ्यामुळे भारत आणि न्यूझीलंडचे रणनितीक संबंध एका नव्या उंचीवर पोहोचणार आहेत.

आर्थिक गेमचेंजर ठरेल असा करार

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनुसार ‘इंडिया ट्रेड डील’मुळे तिथल्या व्यवसायांना मोठा फायदा होणार आहे. 57 टक्के सामानावर कोणताही टॅक्स लागणार नाही. भारताच्या 1.4 अब्जच्या विशाल बाजारपेठेपर्यंत त्यांना सहज पोहोचता येईल. म्हणजे न्यूझीलंडचं सामान कुठल्याही अडथळ्याशिवाय भारतीय बाजारपेठेत येईल. त्यामुळे जास्त पैसा न्यूझीलंडला मिळेल. स्थानिक समुदायाला याचा लाभ होईल. नव्या नोकर्‍या निर्माण होतील. वेतनही वाढेल. हा करार न्यूझीलंडसाठी आर्थिक गेमचेंजर ठरेल असं लक्सन यांना वाटतं.

भारताला एक स्थिर आणि मजबूत प्लॅटफॉर्म मिळणार

हा आर्थिक करार एकतर्फी नाहीय. भारताला सुद्धा या फ्री ट्रेड एग्रीमेंटमुळे मोठा फायदा होणार आहे. कराराच्या अटींनुसार, भारतातून न्यूझीलंडला जाणाऱ्या सर्व सामानाला तिथल्या बाजारपेठांमध्ये कर मुक्त प्रवेश मिळेल. भारतीय निर्यातकांसाठी उच्च इनकम असलेल्या प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्थेत पाऊल ठेवण्याची एक चांगली संधी आहे. हा करार भारताच्या व्यापक इंडो-पॅसिफिक आर्थिक रणनितीचा एक भाग आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर या करारामुळे भारताला एक स्थिर आणि मजबूत प्लॅटफॉर्म मिळणार आहे.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती