Pakistan vs Balochistan : पाकिस्तानचे अजून किती तुकडे पडतील? बलुचिस्तानसोबत विश्वासघाताचा इतिहास काय आहे?
Pakistan vs Balochistan : बलुचिस्तानमुळे पाकिस्तानातील अंतर्गत यादवी समोर आली आहे. बलूचिस्तानचा इतिहास आणि भूगोलात अजून एक बांग्लादेश आहे. 1971 साली आधी पूर्व पाकिस्तान वेगळा झाला. पुढच्या काही काळात पाकिस्तानचे अजून तुकडे पडू शकतात. पाकिस्तानच्या नियतमध्ये असलेली खोट यामागे कारण आहे. कशामुळे पाकिस्तानवर आजही स्थिती ओढवलीय ते एकदा जाणून घ्या.

द्वेषाच्या पायावर उभ्या राहिलेल्या पाकिस्तानला विकास आणि प्रगती या दोन शब्दांचा अर्थ कधीच समजला नाही. दुसऱ्याच्या वाईटात स्वत:चा आनंद शोधण्याच्या वृत्तीमुळे माणसाचा कधी घात होतो, हे त्यालाच कळत नाही. आज पाकिस्तानच्या बाबतीत सुद्धा हेच होतय. भारताच्या वाईटावर टपलेला हा देश आज फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्या देशात गृहयुद्ध सुरु आहे. 11 मार्च रोजी क्वेटावरुन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसच बलूच बंडखोरांनी केलेलं अपहरण हे त्याचच उदहारण आहे. पाकिस्तानात सध्या अंतर्गत यादवी, असंतोषाची स्थिती आहे. एकाबाजूला अफगाणिस्तान सीमेवर तालिबानसोबत संघर्ष सुरु आहे. दुसरीकडे खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान या प्रांतांचा स्वातंत्र्यासाठी लढा सुरु आहे. त्यातून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले होत आहेत. बॉम्बस्फोट, घात लावून सैन्य वाहनावर हल्ला यामध्ये पाकिस्तानी सैनिक, नागरिकांचा नाहक बळी जात आहे. ...