EU Sanctioned : ट्रम्प यांच्यानंतर आता युरोपियन युनियनची भारतावर वाकडी नजर, थेट कारवाई करत दिला मोठा झटका
EU Sanctioned : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता युरोपियन युनियनने भारताला मोठा झटका दिला आहे. युरोपियन संघाने प्रतिबंधाच्या आपल्या 19 व्या पॅकेज अंतर्गत कारवाई केली आहे. युरोपियन संघाच्या या कारवाईवर भारतीय अधिकाऱ्यांची तात्काळ कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.

आधी अमेरिकेने रशियाच्या दोन दिग्गज तेल कंपन्यांवर प्रतिबंधाची कारवाई केली. आता युरोपियन युनियनने रशियावर आर्थिक दबाव टाकण्याच्या उद्देशाने भारताच्या तीन कंपन्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. युरोपियन युनियनने या तीन भारतीय कंपन्यांवर कथितरित्या रशियन सैन्याशी संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. रशियन सैन्याशी कथित संबंध ठेवण्याच्या मुद्यावरुन गुरुवारी युरोपियन युनियनने जगभरातील 45 संस्थांवर बंदीची कारवाई केली होती. यात तीन भारतीय कंपन्या आहेत. युरोपियन संघाने प्रतिबंधाच्या आपल्या 19 व्या पॅकेज अंतर्गत या कंपन्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. रशियाने युक्रेन विरुद्ध युद्ध थांबवावं, यासाठी आर्थिक दबाव टाकण्याच्या प्रत्नाचा हा भाग आहे.
ज्या तीन कंपन्यांवर प्रतिबंध लावलेत, त्यात Aerotrust Aviation Private Limited, Ascend Aviation India Private Limited आणि Shree Enterprises यांचा समावेश आहे. एरोट्रस्ट विमान क्षेत्राशी संबंधित कंपनी आहे. या कंपनीवर रशियन सैन्याला टेक्नोलॉजीचा मदत केल्याचा आरोप आहे. दुसरी Ascend Aviation सुद्धा विमान क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीने निर्यात प्रतिबंधांच उल्लंघन केल्याचा युरोपियन युनियनचा दावा आहे.
भारताची प्रतिक्रिया काय?
तिसरी कंपनी सामान्य व्यापारिक विभाग आहे. ईयूनुसार या कंपनीचे रशियन सैन्यासोबत संबंध आहेत. युरोपियन संघाच्या या कारवाईवर भारतीय अधिकाऱ्यांची तात्काळ कोणती प्रतिक्रिया आलेली नाही. युरोपियन संघाच्या पत्रकात म्हटलं आहे की, युरोपियन परिषदेने 45 नव्या संस्थांची ओळख पटवली आहे. या कंपन्या कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (सीएनसी) मशीन टूल्स, मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, मानवरहित विमानं(यूएवी) आणि अन्य वस्तुंवरील निर्यात प्रतिबंधाकडे दुर्लक्ष करुन रशियन सैन्य आणि मिलिट्री इंडस्ट्रीला थेट सपोर्ट करत आहेत. रशियन संरक्षण क्षेत्राच्या टेक्निकल विकासात योगदान देणाऱ्या दुहेरी वापरांच्या वस्तुंवर कठोर प्रतिबंध लागू होतील असं या पत्रकात म्हटलं आहे.
चीनच्या किती कंपन्यांवर कारवाई?
युरोपियन युनियननुसार, यातील 45 कंपन्यांपैकी 17 कंपन्या रशियामध्ये नाहीत. यात 17 पैकी 12 चीन-हाँगकाँगमध्ये आहेत. तीन भारताच्या आणि दोन थायलंडमध्ये आहेत. युरोपियन युनियनने चीनच्या ज्या 12 कंपन्यांवर प्रतिबंध लावलेत, त्यांच्यावर कथितरित्या रशियन सैन्याला तेल, रसायन आणि दुहेरी वापराच्या वस्तुंचा पुरवठा करुन प्रतिबंधांच उल्लंघन केल्याचा आरोप आहे. युरोपियन युनियनचा मुख्य फोकस रशियाकडून तेल खरेदीदार आणि वाहतुकीवर आहे. त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.
