ट्रम्प यांच्यावर गोळीबार होताच अचानक ‘ही’ लाईट ऑन झाली; जाणून घ्या याचा अर्थ काय

वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या (WHCA) बैठकीदरम्यान गोळीबार झाला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्राध्यक्षांसोबत उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प होत्या. सिक्रेट सर्व्हिस आणि स्पेशल फोर्सेसने तात्काळ सुरक्षा घेरा तयार करून राष्ट्राध्यक्षांना सुरक्षित स्थळी पोहोचवले. यावेळी, सुरक्षा घेऱ्यात विशेष दिवे लावण्यात आले. या लाइट का लावण्यात येतात? त्याचा अर्थ काय असतो जाणून घ्या...

ट्रम्प यांच्यावर गोळीबार होताच अचानक ही लाईट ऑन झाली; जाणून घ्या याचा अर्थ काय
Attack on trump
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 26, 2026 | 11:25 AM

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले आहे. वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये आयोजित ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डेंट्स असोसिएशन’ (WHCA) च्या कार्यक्रमादरम्यान गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्षांसोबत उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वॅन्स आणि पत्नी मेलानिया ट्रम्प देखील उपस्थित होत्या. गोळीबाराचा आवाज ऐकताच सीक्रेट सर्व्हिसने सुरक्षेचे कडे तयार केले आणि राष्ट्राध्यक्षांना सुरक्षितपणे बाहेर नेले. हल्ल्यानंतर लगेचच स्टेजवर शस्त्रास्त्रांसह स्पेशल फोर्स तैनात झाली आणि त्यांनी तात्काळ एक ‘हाय पॉवर लाईट’ ऑन केली. वॉशिंग्टनमध्ये हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी जी लाईट ऑन केली, तो एक ‘स्टँडर्ड सिक्युरिटी प्रोटोकॉल’ असतो. आता हा प्रोटोकॉल नेमका काय आहे? जाणून घ्या…

आवाज न करता होते कारवाई

पांढऱ्या रंगात दिसणारी ही लाईट प्रत्यक्षात SOS लाईट असते. या लाईटचा वापर कोणताही आवाज किंवा गोंधळ न करता, समोरच्या व्यक्तीला सुरक्षेची गरज आहे हे सांगण्यासाठी केला जातो. याशिवाय, सिक्युरिटी ऑपरेशन अधिक प्रभावी करण्यासाठी या लाईटचा वापर होतो. समोर आलेल्या व्हिडीओवरून असे दिसते की, तिथे उपस्थित असलेले काही लोक या लाईटच्या इशाऱ्यावरून कारवाई करू लागले.

या लाईटचा उपयोग काय?

हल्लेखोराची ओळख पटवणे: कमी प्रकाशात किंवा अंधारात हल्लेखोर लपून बसू शकतो किंवा गर्दीत मिसळू शकतो. त्यामुळे ही लाईट ऑन केली जाते.

संशयितावर नजर ठेवणे: संशयित हालचाली किंवा शस्त्रे ओळखणे यामुळे सोपे होते.

CCTV आणि देखरेख सुधारणे: हल्ल्यानंतर प्रखर प्रकाशाची लाईट ऑन करणे सुरक्षा कॅमेऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.

स्पष्ट फुटेज मिळते: लाईट ऑन करण्यामागचा एक उद्देश हा देखील आहे की, कॅमेऱ्यांमध्ये स्पष्ट फुटेज रेकॉर्ड व्हावे.

सुरक्षा दलांसाठी ऑपरेशन सोपे: प्रकाशामुळे स्पेशल फोर्स आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांना चांगला व्ह्यू मिळतो, ज्यामुळे ते वेगाने कारवाई करू शकतात.

अशा लाईटचा वापर कधी केला जातो?

SOS लाईटचा वापर प्रामुख्याने हल्ला, अपघात किंवा आणीबाणीच्या (Emergency) परिस्थितीत केला जातो. SOS लाईट ऑन होण्याचा अर्थ ‘त्वरित लक्ष द्या’ असा होतो. ही लाईट ‘हाय बीम’वर सेट केलेली असते.

Follow Us