Iran Nuclear Radiation Update : इराणच्या अणवस्त्र तळांवरील हल्ल्यानंतर हवेत न्यूक्लियर रेडिएशन पसरतय का? ताजे अपडेट काय?

Iran Nuclear Radiation Update : इराणच्या अण्विक तळांवरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर न्यूक्लियर रेडिएशनच्या महाधोक्याची चर्चा सुरु झाली आहे. न्यूक्लियर रेडिएशन वाढल्यास लगेच मृत्यू होऊ शकतो. त्याशिवाय व्यक्तीच्या डीएनएवर परिणाम होतो. म्हणून न्यूक्लियर रेडिएशनला सर्वात खतरनाक मानलं जातं.

Iran Nuclear Radiation Update : इराणच्या अणवस्त्र तळांवरील हल्ल्यानंतर हवेत न्यूक्लियर रेडिएशन पसरतय का? ताजे अपडेट काय?
Israel Attack Iran
| Updated on: Jun 13, 2025 | 1:29 PM

इराणच्या अण्विक तळांवरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर एका प्रश्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. या हल्ल्यानंतर इराण आणि आसपासच्या देशांमध्ये न्यूक्लियर रेडिएशनमुळे मोठ संकट येणार का?. भारताने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सरगोधा एअरबेसवर हल्ला केल्यानंतर तिथल्या किराणा हिल्सवर रेडीएशन म्हणजे किरणोत्साराची गळती सुरु झाल्याची सोशल मीडियावर अफवा पसरली होती. इस्रायलने इराणवर हल्ला करताना तिथल्या सर्वात मोठ्या यूरेनियम संवर्धन नतांज प्लान्टवर हल्ला केला. हा प्लान्ट पूर्णपणे नष्ट केला. नतांज येथे इराण आपला पहिला अणू बॉम्ब बनवण्याची तयारी करत होता.

नतांजवरील हल्ल्यानंतर तिथे रेडीएशन लीक म्हणजे किरणोत्सार सुरु झालय का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. नतांजवरील हल्ल्यानंतर आंतरराष्ट्री अणूऊर्जा संस्थेच म्हणणं आहे की, न्यूक्लियर रेडिएशनचा धोका नाहीय. इराणच्या न्यूक्लियर रेडिएशनची चिंता करण्याची गरज नाहीय. न्यूक्लियर रेडिएशनला खूप खतरनाक मानलं जातं. अणवस्त्र बॉम्ब बनवण्यासाठी यूरेनियमचा वापर केला जातो. हा एक भारी धातू आहे. युरेनियमच्या संपर्कात आल्याने कॅन्सर, त्वचा जळणे असे गंभीर आजार होऊ शकतात.

न्यूक्लियर रेडिएशनमुळे काय होतं?

न्यूक्लियर रेडिएशन वाढल्यास लगेच मृत्यू होऊ शकतो. त्याशिवाय व्यक्तीच्या डीएनएवर परिणाम होतो. म्हणून न्यूक्लियर रेडिएशनला सर्वात खतरनाक मानलं जातं. इराणचा सध्या सहाठिकाणी युरेनियम संवर्धनाचा कार्यक्रम सुरु होता. आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेनुसार इराणने 9 अणूबॉम्ब बनवण्याइतपत युरेनियम गोळा केलं होतं.

इस्रायलकडे किती अणूबॉम्ब?

इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा इराणवर आहेत. इराणने काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, त्यांच्यावर हल्ला झाल्यास इस्रायलच्या त्या ठिकाणांवर हल्ला केला जाईल, जिथे अणवस्त्र ठेवलेली आहेत. इराणने त्यासाठी गुप्तचरांच्या माहितीचा आधार दिला होता. नागसाकी यूनिवर्सिटीच्या रिपोर्टनुसार, इस्रायलकडे 90 अणूबॉम्ब असून ते सात शहरात सिक्रेट पद्धतीने ठेवण्यात आले आहेत.