VIDEO : धावत जाऊन रिक्षात चढला, जाता जाता तरुणीला किस, भररस्त्यातील प्रकार

पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्टला एका टिकटॉकर महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना उघडकीस आलीय. पाकिस्तानातील एका शहरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO : धावत जाऊन रिक्षात चढला, जाता जाता तरुणीला किस, भररस्त्यातील प्रकार
पाकिस्तानी महिलेचा विनयभंग

नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्टला एका टिकटॉकर महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना उघडकीस आलीय. पाकिस्तानातील एका शहरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग कसा झाला ते स्पष्टपणे दिसत आहे. पाकिस्तानातील एका वर्दळीच्या रस्त्यावर एक व्यक्ती रिक्षात उडी घेतो आणि प्रवासी महिलेचं चुंबन घेत असल्याचं दिसून येतं. घडलेल्या घटनेमुळे पाकिस्तानातील महिलांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे.

नेमका कुठं घडला प्रकार?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ लाहोर शहरातील असल्याचं नेटकऱ्यांचं मत आहे. त्या व्हिडीओत दोन महिला रिक्षातून प्रवास करत होत्या. रिक्षाचा मागील भाग उघडा असल्यानं वर्दळीच्या रस्त्यावर एका व्यक्तीनं उडी घेतली आणि रिक्षात मागच्या बाजूला बसून महिलेचं चुंबन घेत गैरवर्तन केलं. घडलेल्या प्रकारामुळं संबंधित महिला गोंधळली गेली होती. दुचाकीस्वारांचं रस्त्यावर गैरवर्तनामुळं पाकिस्तानातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं दिसून येतं.

महिला संतप्त

रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेसोबत गैरवर्तन झाल्यानं ती संतप्त झालेली दिसली. एका वेळेस तिनं तिची पायातील चप्पल घेऊन त्याला मारण्याचा देखील पर्यत्न केला. संतापाना ती रिक्षातून उडी घेण्याच्या देखील प्रयत्नात होती. मात्र, सहप्रवाशांनी समजवल्यानंतर ती शांत झाली.

सोशल मीडियावर संतापाची लाट

महिलेशी गैरवर्तन झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांनी पाकिस्तान सरकारनं त्या व्यक्तींविरोधात आणि महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या पाकिस्तानच्या झेंड्यामुळे ही घटना देखील 14 ऑगस्टला घडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानात 14 ऑगस्टला लाहोरमध्ये एका टिक टॉकर आणि युट्यूब चॅनेल चालवणाऱ्या महिलेवर 400 लोकांच्या जमावानं हल्ला केला होता. त्या महिलेवर हल्ला करत तिचे कपडे देखील फाडण्यात आले होते. आंतराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची या प्रकरणामुळं नाचक्की झाली होती. त्यानंतर पाकिस्तान सरकारनं संबंधित हल्लेखोरांना अटक केली होती.

इतर बातम्या: 

तालिबान्यांमुळे भारतीयांच्या आयुष्यात पडणार ‘मिठाचा खडा’; तुमच्या रोजच्या जेवणातील ‘ही’ गोष्ट महागणार

अमेरिकेच्या सैन्यावर केलेला हल्ला सहन करणार नाही, बायडन यांचा तालिबानला इशारा

After Tiktoker women man harasses and take kiss Pakistani women sitting in Qingqi rickshaw

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI