AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या सैन्यावर केलेला हल्ला सहन करणार नाही, बायडन यांचा तालिबानला इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करताना तालिबानकडून अमेरिकेच्या सैन्यावर होणारा हल्ला सहन करणार नसल्याचं सांगत तालिबानला सज्जड दम भरलाय.

अमेरिकेच्या सैन्यावर केलेला हल्ला सहन करणार नाही, बायडन यांचा तालिबानला इशारा
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 7:28 AM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करताना तालिबानकडून अमेरिकेच्या सैन्यावर होणारा हल्ला सहन करणार नसल्याचं सांगत तालिबानला सज्जड दम भरलाय. याशिवाय अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलांवरील हल्ले देखील सहन करणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे आतापर्यंत 18,000 लोकांना सुखरुप बाहेर काढल्याचं सांगताना बायडन यांनी रेस्कू ऑपरेशननंतर संपूर्ण सैन्य अफगाणमधून बाहेर काढू, असंही सांगितलं.

जो बायडन म्हणाले, “पुढील आठवड्यात G 7 बैठकीत अफगाणिस्तान मुद्यावर चर्चा करणार आहे. अमेरिकेच्या सैन्यावर केलेला हल्ला सहन केला जाणार नाही. तालिबानने अमेरिकेवर हल्ला केला तर त्याला उत्तर देऊ. NATO देश अमेरिकेबरोबर उभे आहेत. आतापर्यंत 18,000 लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. जेलमधून निघालेले IS चे दहशतवादी हल्ला करू शकतात. अफगाणिस्तानमध्ये संकट मोठं आहे.”

“अफगाणिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणार, महिला-मुलांवरील हल्ले सहन करणार नाही”

“शरणार्थी लोकांना सगळी मदत पुरवण्यात येतेय. जे अमेरिकन नागरिक परत येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना परत आणणार आहे. ISIS दहशतवाद्यांकडून जास्त धोका आहे. आम्ही काबूल एअरपोर्ट पूर्णपणे सुरक्षित केले आहे. अफगाणिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणणार आहे. अफगाणिस्तानमध्ये युद्ध संपवण्याची वेळ आली आहे. महिला आणि मुलांवरचा हल्ला सहन करणार नाही,” अशी भूमिका बायडन यांनी मांडली.

“आम्ही तालिबान बरोबर प्रत्येकवेळी संपर्कात, अफगाणमध्ये अमेरिकेचा स्वार्थ नाही”

“अफगाणिस्तानमधून निघण्याचा निर्णय माझा होता. तालिबानसाठी अफगाणिस्तानमध्ये वेळ कठीण आहे. काबूलमधून एअरलिफ्ट करणं सगळ्यात कठीण काम आहे. आम्ही तालिबान बरोबर प्रत्येकवेळी संपर्कात होतो. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचा काही स्वार्थ नाही. चार्टर्ड विमानाने लोकांना एअरलिफ्ट केले जात आहे. 15 वर्षांपूर्वी अफगाणिस्तान सोडू शकत नव्हतो. जेव्हा आमचे रेस्कु ऑपरेशन पूर्ण होईल त्यानंतर आम्ही पूर्णपणे सैन्य परत बोलावू,” असंही बायडन यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

विमानातून कोसळून मृत्यू झालेल्या तिघांमध्ये अफगाणिस्तानचा नॅशनल फुटबॉलपटू, अन्वरच्या मृत्यूने जगभरात हळहळ

Know This : तालिबानने भारतातून होणारा व्यापार थांबवल्याने परिणाम होणार?

तालिबान विरोधात अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांचा एल्गार, कोण आहेत सालेह?

व्हि़डीओ पाहा :

USA president Joe Biden comment on rescue operation in Afghanistan amid Taliban attack

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.