तुर्कस्तानच्या भूकंपाची भविष्यवाणी आधीच झाली होती, आता भारत-पाकिस्तानचा नंबर ?

फ्रैंक होगरबीट्स यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी तुर्कस्थानच्या बाबतीत भूकंपाची भविष्यवाणी केली होती, त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानबद्दल त्यांनी भाष्य केल्याचे समोर आले आहे.

तुर्कस्तानच्या भूकंपाची भविष्यवाणी आधीच झाली होती, आता भारत-पाकिस्तानचा नंबर ?
Image Credit source: Google
| Updated on: Feb 10, 2023 | 1:40 PM

अंकारा : तुर्कस्तानमध्ये ( Turkey Earthquake ) झालेल्या भूकंपात जवळपास 20 हजारांहून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत असतांना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तुर्कस्थानच्या भूकंपाची भविष्यवाणी ( Predicted )  आधीच करण्यात आली होती. डच संशोधक फ्रैंक होगरबीट्स यांनी ही भविष्यवाणी केली होती. मात्र, यानंतर त्यांनी आणखी एक भविष्यवाणी केली आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. तुर्कस्थान आणि सिरियामध्ये भूकंप झाला आहे, त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे.

आशिया खंडातील देशांना आपत्ती कोसळण्याच्या बाबतीत सर्वाधिक धोका असल्याचेही डच संशोधक फ्रैंक होगरबीट्स यांनी म्हंटलं आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर फ्रैंक होगरबीट्स यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

फ्रैंक होगरबीट्स यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी तुर्कस्थानच्या बाबतीत भूकंपाची भविष्यवाणी केली होती, त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानबद्दल त्यांनी भाष्य केल्याचे समोर आले आहे.

तुर्कस्थान नंतर आशिया खंडातील देशांना भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीला दोन द्यावे लागणार आहे. यामध्ये फ्रैंक होगरबीट्स यांच्या दाव्यानुसार पुढील भूकंप अफगाणिस्तानपासून सुरू होईल आणि पाकिस्तान आणि भारतातून पुढे जाऊन हिंदी महासागरात तो संपुष्टात येईल.

मुहम्मद इब्राहिम नावाच्या एका ट्विटर युजरने माहिती दिली की डच संशोधक फ्रँक हॉगरबिट्स यांनी तीन दिवसांपूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाची भविष्यवाणी केली होती आणि त्यांनी पुन्हा एकदा नवीन भाकीत केले आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार वातावरणातील बदलामुळे आशिया खंडातील देशांना भूकंपाचे धक्के सहन करावे लागत आहे. भूकंप कुठलेही संकेत देत नाही, त्यामुळे अभ्यासानुसार हे भाकीत केल्याची माहिती समोर आली आहे.

3 फेब्रुवारीला डच संशोधक फ्रैंक होगरबीट्स यांनी ट्विट करून भूकंपाबद्दल भाकीत केले होते. त्यानुसार तीन दिवसांनी तुर्कस्थान येथे भूकंप झाला आहे. त्यानुसार आशिया खंडातील देशांच्या बद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.

तुर्कस्थानमध्ये यापूर्वीही भूकंप मोठा भूकंप

तुर्कस्थानमध्ये यापूर्वी लहान मोठे भूकंप झाले आहे. मात्र, आत्ताच्या भूकंपानुसार 1999 मध्ये यापूर्वी मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी अठरा हजार लोकांचा भूकंप झाला होता. तर 45 हजारांहून अधिक नागरिक जखमी झाली होते. गोलकुक और ड्यूज प्रांतात सर्वात मोठे भूकंप झाले होते. त्यावेळी 7.4 आणि 7.0 इतक्या तीव्रतेचे धक्के बसले होत.