लवकरच अमेरिकेच्या 40000 जवानांचा खात्मा? ट्रम्प यांच्या हल्ल्यानंतर खवळलेल्या इराणचा प्लॅन आला समोर

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इराणचा पुढचा प्लान काय आहे? हे समोर आले आहे.

लवकरच अमेरिकेच्या 40000 जवानांचा खात्मा? ट्रम्प यांच्या हल्ल्यानंतर खवळलेल्या इराणचा प्लॅन आला समोर
Iran and USA War
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 22, 2025 | 3:32 PM

इस्रायल आणि इराण युद्धात आता अमेरिकेचीही एन्ट्री झाली आहे. रविवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणने प्रत्युत्तर देत अमेरिकेला थेट धमकी दिली आहे आणि म्हटले आहे की त्यांचा प्रत्येक नागरिक व प्रत्येक सैनिक तेहरानच्या निशाण्यावर आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने देशातील तीन अणुस्थळांवरील हल्ल्यांनंतर प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘आता या क्षेत्रातील प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि सैनिक हा वैध लक्ष्य असेल.’

मिडल इस्टमध्ये ४०,००० अमेरिकन सैनिक

अमेरिकेच्या हल्ल्याच्या काही तास आधीच इराणचे संरक्षणमंत्री अझीझ नसीरझादेह यांनी अमेरिकेला हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. इराणी संरक्षणमंत्र्यांनी म्हटले, ‘सर्व अमेरिकन तळ आमच्या आवाक्यात आहेत आणि जर अमेरिकेने हल्ला केला तर आम्ही त्यांना धाडसाने निशाणा बनवू.’ मध्य पूर्वेत सध्या असलेल्या अमेरिकन तळांवर सुमारे ४०,००० अमेरिकन सैनिक कार्यरत आहेत, जे सामान्यपेक्षा १०,००० जास्त आहेत. हे तळ इराणच्या क्षेपणास्त्रांच्या थेट टप्प्यात आहेत.

Video: मुंबईत राहातोस अन् मराठी बोलता येत नाही; सोनाली कुलकर्णीने भर शोमध्ये कपिल शर्माला झापलं

इराणच्या टीव्ही अँकरने दावा केला की अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात फोर्डो अणुसुविधेच्या प्रवेश आणि निर्गम बोगद्यांना केवळ नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की फोर्डोमधील मुख्य सुविधेला कोणतेही नुकसान झालेले नाही. सरकारी टीव्हीने म्हटले, ‘युद्ध आता सुरू झाले आहे, मिस्टर ट्रम्प! आता तुम्ही शांततेची भाषा करता? आम्ही तुमच्याशी अशा प्रकारे हिशोब चुकता करू की तुम्हाला बेपर्वाईचे परिणाम समजतील.’

खामेनेईंच्या प्रतिनिधीने सांगितले प्रत्युत्तराच्या हल्ल्याबाबत

अमेरिकन हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना खामेनेईंचे प्रतिनिधी हुसैन शरियतमदारी यांनी कायहान वृत्तपत्रात म्हटले, ‘आता विलंब न करता कारवाई करण्याची आमची पाळी आहे. पहिल्या पावलात, आम्ही बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर क्षेपणास्त्र हल्ला करायला हवा आणि त्याचबरोबर अमेरिकन, ब्रिटिश, जर्मन आणि फ्रेंच जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करायला हवी.’