AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: मुंबईत राहतोस अन् मराठी बोलता येत नाही; सोनाली कुलकर्णीने भर शोमध्ये कपिल शर्माला झापलं

Video: सध्या सोशल मीडियावर कपिल शर्मा शोमधील सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती कपिल शर्माला मराठी भाषेवरुन चांगलेच झापताना दिसत आहे.

Video: मुंबईत राहतोस अन् मराठी बोलता येत नाही; सोनाली कुलकर्णीने भर शोमध्ये कपिल शर्माला झापलं
Kapil sharma and sonaliImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 21, 2025 | 5:25 PM
Share

मुंबई, ज्याला आपण ‘मायानगरी’ म्हणतो, ही केवळ भारताची आर्थिक राजधानीच नाही, तर मराठी माणसाच्या हृदयात या शहराला विशेष स्थान आहे. ही नगरी मराठी संस्कृती, भाषा आणि अस्मितेचे जतन करणारी आहे, जिथे मराठी माणूस आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने स्वप्ने साकार करतो. हे शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकांनी मराठी भाषा बोलावी असा आग्रह धरला जातो. सध्या सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती कपिल शर्माला मराठी भाषेवरुन चांगलेच खडसावताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रवी किशन आणि अभिनेते सचिन खेडेकर हे ‘द व्हिसल ब्लोअर’ या वेबसिरीजच्या प्रोमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली होते. या शोमध्ये तिघेही कपिल शर्मासोबत मजा मस्ती करताना दिसले. मात्र, सोनालीने कपिलची मराठी भाषेवरुन चांगलीच फिरकी घेतली आहे.

वाचा: कितने आदमी थे? शोलेतल्या गब्बरला मीच शिकवलं, सचिन पिळगांवकरांनी सांगितलं फेमस डायलॉगचा जन्म कसा झाला?

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सोनाली कपिलला बोलते, ‘तू हिंदी आणि इंग्रजीमध्येच बोलणार का? मराठीत बोल थोडं. मुंबईत तुझा शो शूट होतो. इतकं छान वाटतं मला तुला भेटून. हो की नाही अर्चना. त्याने मराठी बोलायला पाहिजे ना. म्हणजे मी, सचिन आणि रवीला पण फार छान मराठी येतं. अर्चनाला तर फारच सुंदर मराठी येतं. हो की नाही अर्चना. तू मला द व्हिसल ब्लोअरच्या कॅरेक्टरमध्येच भेट म्हणजे मी तुला असं हँडअप करुनच भेटेन. मुंबईत राहातोस, आमच्यासोबत इतकं इकडेतिकडे शुटिंग करतोस, इतके सगळे छानछान कलाकार आहेत आणि तू आमच्याशी मराठी बोलत नाहीस.’ त्यानंतर शांत बसलेले कपिल शर्मा थेट पंजाबी भाषेत बोलू लागतो. ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते.

सध्या सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीचा द कपिल शर्मा शोमधील हा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण या जुन्या व्हिडीओवर पुन्हा कमेंट करुन सोनालीला पाठिंबा देताना दिसत आहेत.

‘द व्हिसल ब्लोअर’ सीरिजविषयी

‘द व्हिसल ब्लोअर’ ही वेबसिरीज सोनी लिव्ह (SonyLIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2013मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेबसिरीजमध्ये, संकेत नावाचा एक तरुण, शिक्षणाच्या क्षेत्रात चालणाऱ्या घोटाळ्यांमध्ये अडकतो. त्याला आपल्या मित्राला वाचवण्यासाठी या घोटाळ्यांविरुद्ध लढावे लागते. सोनाली कुलकर्णी यात शिक्षिका ‘सविता’च्या भूमिकेत आहे, जी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवते. ‘द व्हिसल ब्लोअर’ ही वेबसिरीज शिक्षणाच्या क्षेत्रातील गैरप्रकारांवर भाष्य करते आणि त्याविरोधात आवाज उठवण्याचे महत्त्व दर्शवते.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.