जग हादरलं! फ्लायदुबईसारखे हल्ले होतच राहणार.. अल कायदाची थेट धमकी, अमेरिकेसह..

दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवकडे निघालेल्या फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. भारतीय पायलटमुळे 180 लोकांचा जीव वाचवला. मात्र, आता जगात खळबळ उडवारी धमकी देण्यात आली.

जग हादरलं! फ्लायदुबईसारखे हल्ले होतच राहणार.. अल कायदाची थेट धमकी, अमेरिकेसह..
Flydubai
| Updated on: Oct 04, 2026 | 11:59 AM

फ्लायदुबईचे विमान दुबईहून तेल अवीवकडे निघाले होते. विमान त्याच्या ठराविक उंचीवर पोहोचले. सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. को पायलटने विमान क्रॅश करण्यासाठी भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर हल्ला केला. त्यानंतर विमान थेट खाली आणले आणि विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. स्मित मच्छर यांच्यावर इतका मोठा हल्ला केला की, ते खाली कोसळले. गंभीर जखमी असतानाही त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. विमान वेगाने खाली जात असल्याने प्रवासी कॉकपिटजवळ येऊन उभे होते. जसाही स्मित यांनी दरवाजा उघडला तसे प्रवासी आत आले आणि त्यांनी ओमानच्या को पायलटला पकडून ठेवले. जखमी असतानाही मच्छार यांनी विमानाचे सुरक्षित लॅडिंग केले. त्यात या ओमानच्या पायलटबद्दल धक्कादायक माहिती पुढे येतंय. आता जगाची झोप उडाली आहे.

अल कायदासोबत संबंधित पब्लिकेशननुसार, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याशी संबंधित विमानांना निशाणा बनवणे सुरूच राहणार आहे, अशी थेट धमकीच देण्यात आली. 30 सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या घटनेनंतर हे विधान पुढे आले. संघटनेचे साप्ताहिक प्रकाशन अल बयानच्या ताज्या अंकानुसार अमेरिकेमध्ये झालेल्या 9\11 दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला.

Loading...

त्यात म्हटले गेले की, युद्ध संपले नाही. अमेरिका, इस्त्रायल आणि इस्लामच्या विरोधात लढणाऱ्या देशाच्या आकाशातून जाणाऱ्या विमानांना टार्गेट करून निशाणा बनवले जाईल. नव्या माहितीनुसार, फ्लायदुबईचा को पायलट हमाम अल हमामी याने फ्लायदुबईचे विमान क्रॅश करण्याचा कट रचला होता. हेच नाही तर चाैकशी आहेत धक्कादायक माहिती पुढे आली. ज्याने जगाची झोप उडाली. सर्व सुनियोजित रचलेला कट होता.

त्याच्या सोशल मिडिया खात्यांची तपासणी केली असता तो अल कायदाचे माजी प्रमुख ओसामा बिन लादेन आणि अयमान अल जवाहिरी सारख्याबद्दल लिहिले आहे. इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी यावर भाष्य केले. त्यांनी भारतीय पायलट असलेल्या स्मित मच्छार याचे आभार मानले. यासोबतच इस्त्रायलचा सर्वात मोठा पुरस्कार स्मित मच्छार याला देणार असल्याचे जाहीर केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us