मशरूम खाल्ल्याने झिंग चढली, पायलटचं विमातच भयंकर कृत्य; तब्बल 80 प्रवासी…प्रकरण काय?

विमानातून प्रवास करणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण याच विमानाचा कधीकधी भीषण अपघात होतो. सध्या तर एका पायलटने विमानाचा अपघात घडवून आणण्यसाठी भयंकर कृत केल्याचे समोर आले आहे.

मशरूम खाल्ल्याने झिंग चढली, पायलटचं विमातच भयंकर कृत्य; तब्बल 80 प्रवासी...प्रकरण काय?
plane accident and magic mushroom
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 13, 2025 | 4:43 PM

Plane Crash Accident : विमानाने प्रत्येकालाच प्रवास करावा वाटतो. पण विमानाचा प्रवास जेवढा हवा-हवासा वाटतो, तेवढाच कधी-कधी तो भीतीदायकही होतो. याआधी असे अनेक अपघात झालेले आहेत, ज्यात तांत्रिक बिघाडामुळे विमान जमिनीवर कोसळलेले आहे. अशा अपघातात सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचाही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळेच अशी कोणतीही अघटीत घटना घडू नये यासाठी विमान प्रवास करताना नियमांचे काटेकोर पालन केले जाते. नियमाचे पालन न केल्यास प्रवासी, क्रू मेंबर्स यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचीच प्रचिती आता आली आहे. एका पायलटने मशरूमच्या नशेमुळे अजब कृत्य केले आहे. या कृत्यामुळे सर्वच प्रवाशांचा जीव धोक्यात आला. आता या पायलटला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 2023 साली घडली होती. या घटनेसंदर्भात आता निकाल देण्यात आला असून पायलटवर विमानोड्डाण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तीन वर्ष त्याच्यावर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार जोसेफ एमर्सन नावाचा पायलट एम्ब्रेयर ई-75 जेट विमानातील जंप सिटवर बसला होता. त्याची झोप पूर्ण झालेली नव्हती. मॅझिक मशरूमच्या नशेत त्याने विमान पाडण्याचा प्रयत्न केला. हे विमान सिएटलहून सॅन फ्रान्सिस्को येथे जात होते. या विमानात एकूण 83 प्रवासी होते. तसेच अन्य क्रू मेंबर्सही या विमानात होते.

विमान पाडण्याचा प्रयत्न का केला?

पायलट जोसेफ एमर्सन हा विमानाच्या कॉकपिटमधील जंप सीटवर बसलेला होता. त्याने अचानकपणे कॉकपीटमध्ये वरच्या बाजूला असलेल्या दोन शटऑफ हँडलला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. हे हँडल खाली खेचल्यावर विमानाचे इंजिन थेट बंद होते. या घटनेचा एक ऑडिओ समोर आला आहे. यात जोसेफ विमानाचे हँडल खाली करताना इतर क्रू मेंबर त्याला विरोध करताना समजून येत आहे.

दरम्यान, जोसेफने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहे. त्याने मी मॅझिक मशरूमच्या नशेत असल्याचे सांगितले आहे. ‘मी कुठेतरी फसलेलो आहे, असे मला वाटले. अडकल्यामुळे मला घरी जाता येणार नाही, असे वाटत होते. त्यामुळेच मी ते हँडल खाली खेचले,’ असे स्पष्टीकरण त्याने दिलेले आहे. जोसेफच्या या घटनेनंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. तसेच त्याला 46 दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. सध्या त्याच्यावर वर्ष विशेष पाळत ठेवली जाणार आहे.