AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejas Plane Crash in Dubai : दुबई एअर शोदरम्यान भारताचं तेजस विमान कोसळलं, भारताला सर्वात मोठा झटका

मोठी बातमी समोर येत आहे, दुबई एअर शोदरम्यान मोठा अपघात घडला आहे, एअर शो सुरू असताना भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान क्रॅश झालं आहे. दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

Tejas Plane Crash in Dubai : दुबई एअर शोदरम्यान भारताचं तेजस विमान कोसळलं, भारताला सर्वात मोठा झटका
तेजस लढाऊ विमानाचा अपघात Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2025 | 4:39 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, दुबई एअर शोदरम्यान मोठा अपघात घडला आहे, एअर शो सुरू असताना भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान क्रॅश झालं आहे. एअर शो सुरू असताना हे विमान क्रॅश होऊन वेगानं खाली आलं, घटनास्थळी धूर आणि आगीचे लोळ उठल्याचं पहायला मिळालं. दरम्यान या विमानाच्या पायलटबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये. समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शोदरम्यान हा अपघात घडला आहे, स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी हा अपघात घडला आहे. एअर शो सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे. हे विमान अचानक जमिनीच्या दिशेनं तीव्र वेगात खाली आलं, अन् कोसळलं. घटनास्थळावरून मोठे आगीचे आणि धुराचे लोट उठल्याचं पहायला मिळालं.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की एअर शो सुरू असतानाच हा अपघात घडला आहे, तेजस हे भारताचं स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान आहे. या विमानाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असं नाव दिलं होतं. या अपघातात भारतीय बनावटीचं लढाऊ विमान कोसळल्यानं हा आता भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान हे विमान नेमकं कसं कोसळलं,  लाढाऊ विमान कोसळण्याचं नेमकं कारण काय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

दरम्यान हा एअर शो पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, यामध्ये लहान मुलांचा देखील मोठ्या संख्येनं समावेश होता. अपघात होताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं,  गर्दीला अपघात स्थळापासून पांगवण्यात आलं आहे.  दरम्यान या विमानात असलेल्या पायलटबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये, त्याचा शोध सुरू आहे.

Tejas Mk1 मधून इंधनाच्या गळतीची सत्यता  

दरम्यान दुबई एअर शोचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये Tejas Mk1  मधून इंधनाची गळती होत असल्याचं दिसून येत होतं, मात्र हा व्हिडीओ बनावट असल्याचं फॅक्ट चेकमधून समोर आलं होतं.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.