Vastu Shastra : घरात या दिशेला कधीच मौल्यवान वस्तू ठेवू नका, अन्यथा कंगाल झालाच म्हणून समजा
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यास मदत करतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट दिशा ठरलेली असते, आणि त्या -त्या गोष्टी त्याच दिशेला ठेवल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळे घरात कधीच वास्तुदोष निर्माण होत नाही.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे तुमचं घर कसं असावं? याबद्दल तर मार्गदर्शन करतंच, मात्र सोबतच तुमच्या घरात काही वास्तुदोष निर्माण झाले असतील, ज्यामुळे तुम्हाला अडचणी येत असतील, तर असा वास्तुदोष दूर करण्याचे उपाय देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात ज्या वस्तू ठेवतात, त्या प्रत्येक वस्तुंची विशिष्ट दिशा ठरलेली असते. जसं की घड्याळ हे घरात नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावं. घड्याळ जर पूर्व दिशेला असेल तर घरात शांतता राहते, कुटुंबाला आरोग्य लाभतं. जर घड्याळ उत्तर दिशेला असेल तर घरात आर्थिक आवक चांगली राहते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, तसेच देवघराचं देखील आहे, वास्तुशास्त्रानुसार देवघर हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावं, परंतु अशा देखील काही दिशा असतात, ज्या दिशेला चुकीच्या वस्तू ठेवल्या तर त्याचा मोठा फटका आपल्याला बसू शकतो, घरात वास्तुदोष निर्माण होतो.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचं एक विशिष्ट महत्त्व आहे. जस की उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. त्यामुळे उत्तरेकडून सतत धनाची आवक होत असते, तर दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा पैसे किंवा मौल्यवान वस्तू घरात ठेवता, तेव्हा दिशा लक्षात घेतली पाहिजे, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या घरातील मौल्यावान वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने हे वायव्य दिशेला ठेवता तेव्हा ते अतिशय शुभ मानलं जातं, तुमच्या घराची भरभराट होते.
मात्र चुकूनही मौल्यवान वस्तू किंवा पैसे हे घराच्या दक्षिण दिशेला ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं, दक्षिण दिशेला मौल्यवान वस्तू ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुमच्या घराची तिजोरी ही नेहमी उत्तर दिशेला असावी असंही वास्तुशास्त्र सांगतं, घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावणं शुभ मानलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
