Chanakya Neeti : या 3 गोष्टी आहेत आयुष्यातील सर्व अडचणींचं कारण, आयुष्यभर करावा लागेल पश्चताप
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ होते, माणसाने आपल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं? हे चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये फार सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे, तसेच त्यांनी काही गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव करून आपल्या अपमानाचा बदला घेतला, त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाने आपल्या आयुष्याचं नियोजन कसं करावं? हे फार सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. आयुष्यात काय केलं पाहिजे आणि करू नये? याबद्दलही चाणक्य सांगतात. चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात ज्या मानसाने टाळायला हव्यात, त्यातच त्याचं हित आहे. मात्र जर या गोष्टी जगसमोर आल्या तर मात्र अशा व्यक्तीवर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते. हा समाज त्याला सुखानं जगू देत नाही. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल.
आर्थिक अडचणी – चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक अडचणी या असतातच, मात्र कितीही मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली किंवा आपल्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं तरी या गोष्टींची चर्चा कधीच चारचौघात करू नये. कारण अशा गोष्टी कधीच चर्चेमधून सुटत नसतात. उलट कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे त्याची आर्थिक स्थिती कशी आहे? यावरून ठरत असतं. जेव्हा लोकांना कळतं तुमची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे, तेव्हा जे लोकं आतापर्यंत तुमच्या मागे-पुढे करत होते, ते सर्व तुमच्याशी संबंध तोडून टाकतात, त्यामुळे आपली आर्थिक स्थिती काय आहे? याबद्दल कोणाशीही चर्चा करू नका.
कौटुंबिक कलह – चाणक्य म्हणतात जर तुमच्या घरात कौटुंबिक कलह असतील तर ते घराच्या आतच मिटवा, त्यांना बाहेर येऊ देऊ नका. कारण जेव्हा असे वाद चव्हाट्यावर येतात. तेव्हा ते कधीच मिटले जात नाहीत, किंवा मिटू दिले जात नाहीत. त्यामुळे तुमच्यावर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येऊ शकते.
अपमान – जर तुमचा एखाद्या व्यक्तीने अपमान केला असेल, तर ते इतर कोणाला कधीच सांगू नका, त्यामुळे फक्त चर्चा होईल. तुम्ही तुमचा अपमान कायम लक्षात ठेवा, आणि जेव्हा योग्य संधी मिळेल तेव्हा अपमानाचा बदला घ्या, परंतु चर्चा कुठेच करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
