जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत Jeff Bezos यांची गर्लफ्रेण्डच्या भावाकडे 12 कोटींची मागणी

| Updated on: Jan 27, 2021 | 1:47 PM

जेफ बेझॉस यांची गर्लफ्रेण्ड लॉरेन सांजेचा भाऊ मायकलने बेझॉस आणि त्यांचे सुरक्षा सल्लागार गाविन दे बेकर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. (Jeff Bezos Girlfriend's Brother)

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत Jeff Bezos यांची गर्लफ्रेण्डच्या भावाकडे 12 कोटींची मागणी
Follow us on

न्यूयॉर्क : ऑनलाईन शॉपिंग कंपनी अ‍ॅमेझॉनचे (Amazon)सीईओ जेफ बेझॉस (Jeff Bezos) यांनी आपल्या गर्लफ्रेण्डच्या भावाकडून 1.7 मिलियन डॉलर (जवळपास 12 कोटी 39 लाख 64 हजार 170 रुपये) मागितले आहेत. मानहानीच्या खटल्यात पराभूत झालेल्या मायकल सांजेकडे (Michael Sanchez) जेफ बेझॉस यांनी खटल्याच्या कायदेशीर फीच्या भरपाईची मागणी केली आहे. जेफ बेझॉस हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. (Amazon Founder Jeff Bezos Wants 1.7 Million Dollar in Legal Fees From Girlfriend’s Brother)

कोर्टाचा मायकलला दणका

जेफ बेझॉस यांची गर्लफ्रेण्ड लॉरेन सांजेचा (Lauren Sanchez) भाऊ मायकलने बेझॉस आणि त्यांचे सुरक्षा सल्लागार गाविन दे बेकर (Gavin de Becker) यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. आपले न्यूड फोटो मायकलने लीक केल्याचं बेझॉस यांनी पत्रकारांना सांगितलं आणि माझी बदनामी केली, असा आरोप त्याने केला होता. मात्र या चर्चा पत्रकारांकडून ऐकल्याशिवाय कुठलेही सबळ पुरावे मायकलकडे नसल्याने कोर्टाने त्याचा खटला निकाली काढला.

बेझॉस यांचा मायकलवर पलटवार

मायकल सांजेने लॉरेन आणि आपल्यातील वैयक्तिक संभाषण एका वृत्तपत्राला दोन लाख डॉलर्सना (अंदाजे 1 कोटी 46 लाख रुपये) विकले. त्यानंतर त्रास देण्यासाठी हे संभाषण जाहीर करण्यासाठी पैसे मागितले, असं बेझॉस यांनी लॉस अँजेलस सुपिरियर कोर्टात दाखल अर्जात म्हटलं आहे. मायकलने आपल्या बहिणीसह माझ्याही पाठीत खंजीर खुपसला आणि आम्हाला मानसिक त्रास दिला, असा जबाब बेझॉस यांनी दिला. त्यानंतर कोर्टाने हा खटला निकाली काढला. खटल्याची कायदेशीर फी समोरच्या पक्षाकडून वसूल करण्याच्या तरतुदीनुसार बेझॉस यांनी मायकलकडेच भरपाई मागितली.

बेझॉसच्या पत्नीचा 31,000 कोटींचा दानयज्ञ

कोणे एके काळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेल्या अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांचा जुलै 2019 मध्ये मॅकेंझी स्कॉट यांच्याशी घटस्फोट झाला. यासाठी दोघांमध्ये 3800 कोटी डॉलर म्हणजेच 2.60 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा करार झाला. कंपनीची चार टक्के भागिदारीही त्यांना मिळाली. घटस्फोटानंतर त्या अचानक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 22 व्या क्रमांकावर आल्या होत्या.

मॅकेंझी स्कॉट सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 18 व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 60.7 बिलियन डॉलर (अंदाजे 4 लाख कोटी रुपये) इतकी आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मॅकेंझी स्कॉट त्यांचं नशीब पालटलं. कोरोना काळात अ‍ॅमेझॉनला व्यवसायात झालेल्या नफ्याचा लाभही त्यांना झाला. मात्र त्यानंतर स्कॉट यांनी दानधर्माची योजना आखली.

संबंधित बातम्या :

जगातील सर्वात महागड्या घटस्फोटानंतर बेझॉसच्या पत्नीचा 31,000 कोटींचा दानयज्ञ

अखेर मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

(Amazon Founder Jeff Bezos Wants 1.7 Million Dollar in Legal Fees From Girlfriend’s Brother)