जगातील सर्वात महागड्या घटस्फोटानंतर बेझॉसच्या पत्नीचा 31,000 कोटींचा दानयज्ञ

मॅकेंझी स्कॉट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 18 व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 60.7 बिलियन डॉलर आहे

जगातील सर्वात महागड्या घटस्फोटानंतर बेझॉसच्या पत्नीचा 31,000 कोटींचा दानयज्ञ
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 3:50 PM

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग कंपनी अ‍ॅमेझॉनचे (Amazon) मालक जेफ बेझॉस (Jeff Bezos) यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मॅकेंझी स्कॉट (Mackenzie Scott) रातोरात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गेल्या. त्यानंतर गरजूंना पैसे दान करण्याचा सिलसिला मॅकेंझींनी सुरु केला. आपली अधिकाधिक संपत्ती दान करण्याचा मानस व्यक्त करत मॅकेंझी स्कॉट यांनी 4.2 बिलियन डॉलर (अंदाजे 31 हजार कोटी रुपये) दान करण्याचं जाहीर केलं. (Amazon boss Jeff Bezos ex wife Mackenzie Scott will donate 4 billon dollar)

गेल्या चार महिन्यांच्या काळातील ही दुसरी मोठी घोषणा आहे. याआधी त्यांनी 116 संघटनांना 1.7 बिलियन डॉलर (अंदाजे 12 हजार कोटी रुपये) दान केले होते. आता आणखी 384 संघटनांना त्यांच्या दानयज्ञाचा लाभ होणार आहे. ‘जे अमेरिकन नागरिक आधीच संघर्षमय जीवन जगत होते, त्यांचं कंबरडं कोरोना महामारीने अक्षरशः तोडलं आहे. आर्थिक आणि आरोग्यावर झालेल्या परिणामामुळे महिला, कृष्णवर्णीय आणि गरिबांना मोठा फटका बसला. मात्र श्रीमंतांची संपत्ती सातत्याने वाढतच राहिली’ असं मॅकेंझी स्कॉट यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.

स्कॉट मदत करण्यास इच्छुक असलेल्या संघटनांची नाव आपल्याला त्यांच्या पोस्टमध्ये वाचायला मिळतात. ज्यांच्याकडे पर्यायी आर्थिक स्त्रोत नाहीत, अशा समुदायांचा समावेश आहेच. पण नागरी अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्या भेदभावाविरोधात कायदेशीर लढाई लढणाऱ्या समूहांची नावंही यादीत आहेत.

384 संघटनांची निवड

मॅकेंझी स्कॉट या लेखिका आणि समाजसेविका आहेत. आपल्या टीमने 6 हजार 490 संघटनांचा आढावा घेतल्यानंतर 384 संघटनांची निवड केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटीला 40 मिलियन डॉलरची मदत केली होती. या विद्यापीठाला इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात कोणीच दानधर्म केलं नव्हतं. याशिवाय टेक्सासमधील एका विद्यापीठाला स्कॉट यांनी 50 मिलियन डॉलर दान केले आहेत.

श्रीमंतांच्या यादीत 18 व्या स्थानी

मॅकेंझी स्कॉट सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 18 व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 60.7 बिलियन डॉलर (अंदाजे 4 लाख कोटी रुपये) इतकी आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मॅकेंझी स्कॉट त्यांचं नशीब पालटलं. कोरोना काळात अ‍ॅमेझॉनला व्यवसायात झालेल्या नफ्याचा लाभही त्यांना झाला.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांच्याशी मॅकेंझी स्कॉट यांचा घटस्फोट झाला. यासाठी दोघांमध्ये 3800 कोटी डॉलर म्हणजेच 2.60 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा करार झाला. कंपनीची चार टक्के भागिदारीही त्यांना मिळाली. घटस्फोटानंतर त्या अचानक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 22 व्या क्रमांकावर आल्या. मात्र त्यानंतर स्कॉट यांनी दानधर्माची योजना आखली.

संबंधित बातम्या :

अखेर मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

कोरोनामुळे 4,00,000 नाविक समुद्रात अडकले, मदतीसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला आवाहन

(Amazon boss Jeff Bezos ex wife Mackenzie Scott will donate 4 billon dollar)

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.