अमेरिका हादरली! हल्लेखोराकडून बेधुंद गोळीबार, गरोदर महिलेसह 9 ठार

अमेरिकेत बेधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात गरोदर महिलेसह 9 जण ठार झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये भीती पसरली आहे.

अमेरिका हादरली! हल्लेखोराकडून बेधुंद गोळीबार, गरोदर महिलेसह 9 ठार
america firing
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 9:56 AM

अमेरिकेच्या पेनसिलव्हेनिया राज्यातील एरीमध्ये बेधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात लहान मुले, गरोदर महिलेसह 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत संशियत हल्लेखोराचा देखील मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोराने आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेतली. एका स्थानिक नागरिकाने गोळीबार करणाऱ्याला पाहिलं. त्यानंतर स्थानिकाने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथे दोन महिलांचे मृतदेह आढळले.

हल्लेखोर माथेफिरू असल्याचा संशय 

Loading...

एरी येथील पोलिसांनी सांगिगतलं की, पीडित नागरिक आणि संशयित हल्लेखोर एकाच घरात आढळले. एकाच घरात सर्वांचे मृतदेह आढळले. मृतांपैकी एका वगळता बाकी जण एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. हल्लेखोराने हादरवणारं कृत्य का केलं, याचं कारण समोर आलेलं नाही. हल्लेखोर माथेफिरू असल्याने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचे व्हिडिओ फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. एका व्हिडिओमध्ये गोळीबारानंतर 51 आणि 37 वर्षीय दोन महिला या लोकांना मदत मागताना दिसत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात भीती पसरली आहे. वाढत्या गोळीबाराच्या घटनेने स्थानिकांचं टेन्शन वाढलं आहे. स्थानिक नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. तर काही नागरिकांकडून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

गोळाबारात नऊ जण दगावले 

या व्हिडिओमध्ये हल्लेखोर गोळीबार करतानाही दिसत आहे. या संशयित हल्लेखोराने महिलेवर गोळीबार केल्याचा संशय आहे.  घरात कोणत्याही प्रकारचा आवाज येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी घरात प्रवेश केला. तर याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 5 आणि 1 वर्षांची दोन मुले आढळून आली. दुसर्‍या मजल्यावर दोन महिलांचे मृतदेह आढळले. त्यांच्या बाजूला दोन पुरुषांचे मृतदेह आढळले.  गोळीबारात 9 जणांच्या मृत्यूनंतर पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शॅपिरो यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिलं आहे. यावेळी त्यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. आमच्या संवेदना पीडितांच्या कुटुबीयांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us