
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची 15 ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या बैठकीनंतर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या बैठकीपूर्वी युरोपमध्ये घडामोडींना वेग आला असून, एका मोठ्या युद्धाचे संकेत मिळत आहेत. 9 ऑगस्टला अमेरिकेच्या वायुदलाने अमेरिकेचे बी-१बी लान्सर बॉम्बर विमान नॉर्वेतील ऑरलँड एअर बेसवर उतरवले आहेत. जिथे अमेरिकेनं नाटो सहयोगी देशांसोबत उच्च-स्तरीय प्रशिक्षण मोहीम सुरू केली आहे.
मात्र अमिरेकेनं उचललेलं हे पाऊल रशियाची चिंता वाढवणारं आहे. रशियानं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, त्याच्या सीमेजवळ नाटोची उपस्थिती दर्शवणारं कोणतंही पाऊल धोकादायक ठरू शकतं. अमेरिकेच्या या तीन बॉम्बर विमानांनी टेक्सासमधील डायस एअर फोर्स बेसवरून उड्डाण केलं आहे, हे विमानं थेट नॉर्वेच्या एअर बेसवर उतरली आहेत, इथे अमेरिकेनं नाटो देशांसोबत युद्ध सराव सुरू केला आहे.
नाटो देशानं सुरू केलेल्या या मोहिमेमुळे एखाद्या मोठ्या युद्धाची तयारी सुरू असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 15 ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. जर या बैठकीनंतरही युद्ध विरामाची घोषणा झाली नाही तर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं हे युद्ध संपूर्ण युरोपमध्ये पसरण्याची शक्यता आहे. आमची ही बैठक यशस्वी होईल असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे, मात्र त्यापूर्वी अमेरिकेनं आपले बॉम्बर विमानं नॉर्वेच्या एअरबेसवर उतरवल्यानं खळबळ उडाली आहे.
नॉर्वेमध्ये सुरू असलेला हा युद्ध अभ्यास सामान्य नाही तर त्यामधून युद्धाचे संकते मिळत आहेत, कारण सध्या इथे अमेरिकेनं नाटो देशांसोबत खतरनाक युद्ध अभ्यासाला सुरुवात केली आहे, टार्गेटचा शोध घ्या आणि हल्ला करा, हल्ला झाल्यास बचाव कसा करायचा याचा सराव इथे सुरू आहे, त्यामुळे पुन्हा एकदा युद्धाचे संकेत मिळत आहेत.