AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा अभिमान कोसळला ! जगातले सर्वात महागडे F-35 लढाऊ विमान क्रॅश

एक मोठी बातमी हाती आली आहे. F-35 लढाऊ विमानाचा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये मोठा अपघात झाला आहे. F-35 लढाऊ विमान कोसळले आहे. याविषयी पुढे विस्ताराने वाचा.

अमेरिकेचा अभिमान कोसळला ! जगातले सर्वात महागडे F-35 लढाऊ विमान क्रॅश
f-35 crashed
| Edited By: | Updated on: Jul 31, 2025 | 7:01 PM
Share

अमेरिकेचा अभिमान कोसळला आहे. F-35 लढाऊ विमानाचा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये मोठा अपघात झाल्याची माहिती आहे. यातील वैमानिकाने वेळीच पॅराशूटमधून बाहेर पडून आपला जीव वाचवला. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, यात कुणाला दुखापत झाली, याची माहिती पुढे वाचा.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आज मोठा अपघात झाला. अमेरिकन नौदलापैकी F-35 लढाऊ विमान नेव्हल एअर स्टेशन लेमूरजवळ हा अपघात झाला. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. अमेरिकन नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील वैमानिकाने वेळीच पॅराशूटमधून बाहेर पडून आपला जीव वाचवला.

नौदलाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हे विमान स्ट्राईक फायटर स्क्वाड्रन VF-125 रफ रेडर्सचा भाग होते. युनिट फ्लीट रिप्लेसमेंट स्क्वाड्रन म्हणून कार्य करते, ज्याचे मुख्य कार्य वैमानिक आणि एअरक्रूला प्रशिक्षण देणे आहे.

लेमूर नौदलतळ कुठे आहे?

लेमूर नौदल तळ अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात असून फ्रेस्नो शहराच्या नैऋत्येस सुमारे 64 किलोमीटर अंतरावर आहे.

F-35 विमान कसे कोसळले?

अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. अमेरिकन नौदलाने तपास सुरू केला आहे. दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत अन्य कोणीही जखमी झाले नाही. अमेरिकेच्या लष्करी तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच ही घटना घडली आहे. F-35 ही जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांमध्ये गणली जाते, त्यामुळे त्याच्या अपघातामुळे निश्चितच मोठे प्रश्न निर्माण होतात.

अमेरिकेने आपले सर्वात प्रगत आणि घातक लढाऊ विमान F-35 म्हणून जे सादर केले आहे, ते आता कचऱ्याचे वाटू लागले आहे. वारंवार होणारे अपघात, तांत्रिक बिघाड आणि महागड्या देखभालीमुळे पाचव्या पिढीचे हे लढाऊ विमान आपली चमक गमावत आहे.

आता ताजे प्रकरण समोर आले आहे. यापूर्वी भारतात याच विमानाने पाश्चिमात्य तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 14 जून रोजी ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या F-35 B विमानाचे केरळमधील तिरुवनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान महिनाभर तेथेच उभे होते.

हे विमान परत मिळवण्यासाठी ब्रिटिश अभियंत्यांचे पथक 6 जुलै रोजी विशेष सुटे भाग आणि उपकरणे घेऊन आले होते.

तिरुवनंतपुरम विमानतळावर अनेक महिन्यांपासून उभ्या असलेल्या या ‘अ‍ॅडव्हान्स्ड’ लढाऊ विमानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मीम्स तयार करण्यात आले आणि अमेरिकन तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

कॅलिफोर्नियात बुधवारी घडलेला हा एकमेव अपघात नाही. जानेवारी 2025 मधील एका अहवालानुसार F-35 सीरिजचे आतापर्यंत 11 हून अधिक अपघात झाले आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.