
१९६० च्या दशकात साल १९५९ च्या एप्रिल महिन्यात इजिप्तची राजधानी काहिरा (कैरो ) येथील एका उकाडा असलेल्या रात्री अरब पेट्रोलियम काँग्रेसची बैठक बोलवली गेली होती. त्याच्यापासून दूर काही अंतरावर एक गुप्त बैठक सुरु होती. या मुलाखतीतील निकाल येणाऱ्या काळात जगातील तेल बाजाराची कहाणी बदलणार होते. वास्तविक १९६० दशकात जगाच्या इंधन बाजारात सात कंपन्यांचा दबदबा होता. या कंपन्या तेल बाजारावर राज्य करत होत्या. त्यांना सेव्हन सिस्टर्स संबोधले जाते. या कंपन्यांच्या विरोधातच अरब पेट्रोलियम काँग्रेसने ही बैठक बोलावली होती. यावेळी निर्णय उघडपणे घेण्यात येणार होता. याच वेळी काहीरातील या बैठकीपासून अंतरावर दोन देशांचे ऊर्जामंत्री एका मोठी खेळी रचत होते. एक होते व्हेनेझुएलाची इंधन ( ऊर्जा मंत्री ) जुआन पाब्लो पेरेज अल्फोंझो आणि दुसरे होते सौदी अरबचे पेट्रोलियम मंत्री शेख अब्दुल्ला तारीकी… काहिराच्या त्या गुप्त बैठकीत सेव्हन सिस्टर्सना मध्य पूर्व आणि व्हेनेझुएलातून बाहेर काढायचा ठरले. ही तिच बैठक होती ज्यात ‘ओपेक’ची मुहूर्तमेढ रोवली गेली ! ...