इराणच्या धमकीवर अमेरिका घाबरली, थेट काही तासातच घेतला धक्कादायक निर्णय, थेट अमेरिकनच..

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले असून मोठे हल्ले केले जात आहेत. अमेरिकेकडून इराणच्या सर्वाेच्च नेत्याला टार्गेट करून मोठ्या शहरांवर घातक हल्ले केले जात आहेत. दुसरीकडे इराणकडून अमेरिकेच्या लष्कर तळावर आणि अमेरिकन दूतावासावर हल्ले केले जात आहेत.

इराणच्या धमकीवर अमेरिका घाबरली, थेट काही तासातच घेतला धक्कादायक निर्णय, थेट अमेरिकनच..
America Iran war
| Updated on: Mar 06, 2026 | 7:59 AM

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेने भारतातून युद्ध सराव करून इराणच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणने थेट मोठी धमकी दिली. युद्धनाैकेवर केलेल्या हल्ल्यानंतर इराण हा अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. थेट इस्त्रायलमधील परमाणू केंद्रांवर हल्ला करण्याची धमकी इराणकडून देण्यात आली. जर खरोखरच इराणने असे काही केले तर संपूर्ण जग मोठ्या संकटात सापडेल. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर अत्यंत घातक हल्ले केले जात आहेत. सोशल मीडियावर इराणमधील स्थितीचे काही व्हिडीओही पुढे येत आहेत. ज्या व्हिडीओंमध्ये लहान लहान मुले हल्ल्यामध्ये गंभीर जखमी होताना दिसत आहेत. हेच नाही तर युद्ध थांबवण्याचे मेसेज देखील या लहानग्या मुलांकडून दिली जात आहेत. इराणमधील स्थिती गंभीर आहे.

इराणची आक्रमक बघून अमेरिकेने मोठा निर्णय घेतला. अमेरिकेकडून थेट कुवेतमधील अमेरिकन दूतावास रिकामे करण्यात आले. युद्धानंतर इराणकडून कुवेतमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला करण्यात आला होता. रियाधमधील अमेरिकन दूतावास आणि दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाला इराणकडून टार्गेट करत हल्ले करण्यात आली.

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी म्हटले की, अमेरिका इराणच्या जमिनीवर उतरून हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मोज्तबा खामेनेई आणि आयातुल्ला अली खामेनेई यांचे अनुयायी या लोकांना मारून बंदिवान करून अमेरिकन अधिकाऱ्यांना अपमानित करण्यास तयार आहेत. इराण भुतांना नाचण्यासाठीचे ठिकाण नसल्याचाही त्यांनी इशारा दिला.

म्हणजे जर अमेरिकेचे सैन्य इराणच्या जमिनीवर उतरून हल्ला करण्याच्या तयारीत असेल तर त्यांना आम्ही तसेच उत्तर देऊ असे स्पष्ट शब्दात आता इराणकडून सांगण्यात आले आहे. या युद्धाच्या झळा फक्त या तीन देशांपुरत्या मर्यादित राहिल्या नसून या युद्धाचा फटका अनेक देशांना बसताना दिसत आहे. अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या देशांमध्येही इराणने मोठे हल्ले केले. मात्र, इराणकडून महत्वाचा समुद्री मार्ग बंद करण्यात आल्याने अनेक देश संकटात आली आहेत.

Follow Us