हे काय भलतंच! 22 वर्षाचा पोरागा पडला 72 वर्षीय म्हातारीच्या प्रेमात, थाटात केलं लग्न

दोघांच्या वयामध्ये साधारण 50 वर्षांचा फरक आहे. परंतु आता एलेनोर माझा जीव आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तीदेखील माझ्यावर खूप प्रेम करते, असे डॅनियल सांगतो. वय हा फक्त एक आकडा आहे. आम्ही दोघेही एकमेकांना खूप समजून घेतो, असंही त्याचं मतआहे.

हे काय भलतंच! 22 वर्षाचा पोरागा पडला 72 वर्षीय म्हातारीच्या प्रेमात, थाटात केलं लग्न
daniel and senior love story
Image Credit source: Psychological (instagram page)
| Updated on: Jul 02, 2026 | 2:41 PM

Unique Love Story : प्रेमाला वयाची अट नसते. कधी कोणावर प्रेम होईल हे सांगता येत नाही. अनेकवेळा दोन भिन्न देशाचे तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे समोर आलेले आहे. पाकिस्तानची सीमा हैदर आणि भारताचा सचिन याचं सर्वात गाजलेलं उदाहरण आहे. सध्या मात्र अजब-गजब प्रेमाची जगभरात चर्चा होत आहे. या लव्हस्टोरीबाबत सोशल मीडियावर वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहे. इन्स्टाग्रामच्या एका पेजवर या प्रेम प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार एक 22 वर्षाचा तरुण आपल्यापेक्षा 50 वर्षांपेक्षा मोठ्या म्हणजेच 72 वर्षीय वृद्ध महिलेच्या प्रेमात पडला आहे. या कपलने अधिकृतपणे लग्नही केलं असून त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेमका प्रकार काय?

आगळ्या-वेगळ्या प्रेमाची ही कथा डोमिनिकन रिपब्लिक या देशातील आहे. या देशातील 22 वर्षीय डॅनियल रामिरेज आणि अमेरिकेची 72 वर्षीय एलोनोर हेज हे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या दोघांनीही प्रेमविवाह केला आहे. डॅनियल एका छोट्याशा कॅफेत आपल्या कुटुंबाला मदत करायचा. साधारण दोन वर्षांपूर्वी एलेनोर हेज सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी डोमिनिकन रिपब्लिकमध्ये फिरायला आल्या होत्या. त्या अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहतात. त्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टर आहेत. डॅनियल आणि एलोनेर यांची दोन वर्षांपूर्वी भेट झाली होती. तेव्हापासून त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. हीच जवळीक नंतर प्रेमात बदलली.

मी तिच्यावर खूप प्रेम करतो

दोघांच्या वयामध्ये साधारण 50 वर्षांचा फरक आहे. परंतु आता एलेनोर माझा जीव आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तीदेखील माझ्यावर खूप प्रेम करते, असे डॅनियल सांगतो. वय हा फक्त एक आकडा आहे. आम्ही दोघेही एकमेकांना खूप समजून घेतो, असंही त्याचं मतआहे.

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

दरम्यान, एलेनोर या अमेरिकेतील कोट्यधीश आहेत. त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. डॅनियलने एलेनोर यांची संपत्ती पाहूनच त्यांच्याशी लग्न करण्यााच निर्णय घेतला, अशा कमेंट्स सोशल मीडियावर केल्या जात आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या दोघांना पाठिंबा दिला आहे.

(टीप- सोशल मीडियावर आलेल्या माहितीवर आधारलेली ही स्टोरी आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Follow Us