AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Firing : अमेरिका हादरली, नॉर्थ कॅरोलिनामध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची माहिती

US Firing : जेकब एडम्स शाळेत चाललेला. त्यावेळी दोन ड्रायव्हरमध्ये भांडणं झालं. एकाने गोळीबार केला. यात जेकबचा मृत्यू झाला. अमेरिकेत 2025 मध्ये आतापर्यंत 350 पेक्षा जास्त मास शूटिंगच्या घटना घडल्या आहेत.

US Firing : अमेरिका हादरली, नॉर्थ कॅरोलिनामध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची माहिती
US Firing
| Updated on: Nov 22, 2025 | 10:00 AM
Share

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. कॉनकॉर्ड येथे वार्षिक ख्रिस्मस सोहळ्यादरम्यान हा गोळीबार झाला. यात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, शहरात 28 व्या वार्षिक ख्रिस्मस ट्री लायटिंग सेरेमनी दरम्यान हा गोळीबार झाला. त्यावेळी तिथे एकच गोंधळ उडाला. लोक सैरावैरा पळू लागले. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय. गर्दी ही सुरक्षित स्थळी आसरा शोधण्यासाठी पळताना दिसतेय. कॉनकॉर्ड पोलिसांनी तात्काळ पावलं उचलली. चर्च स्ट्रीट आणि कॅबरस एवेन्यूजवळच्या क्राइम सीन भोवती सुरक्षाकडं केलं आहे. गोळीबार कोणी केला? हे अजून समजू शकलेलं नाही. सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत.

नॉर्थ कॅरोलिनाच्या कॉनकॉर्डमध्ये झालेल्या या घटनेबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, शुक्रवारी संध्याकाळी वार्षिक ट्री लायटिंग सेरेमनी दरम्यान झालेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत. कॉनकॉर्ड पोलीस मेजर पॅट्रिक टियरनी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, शूटिंगची घटना संध्याकाळी 7.30 वाजता यूनियन स्ट्रीटवर कॉर्बिन एवेन्यूजवळ झाली. इवेंटपासून काही अंतरावर ही जागा आहे.

अन्य कार्यक्रम रद्द

शहराच्या अधिकाऱ्यांनी या घटनेच्यी पृष्टी केली आहे. खबरदारी म्हणून शहरात होणारे अन्य कार्यक्रम रद्द केले आहेत. या गोळीबारात किती जखमी झाले, संशयिताचा उद्देश याबद्दल अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण चौकशी सुरु आहे. कोणाकडे काही माहिती असल्यास कॉनकॉर्ड PD से (704) 920-5027 संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलय. शहरात ख्रिसमस परेड शनिवारी 22 नोव्हेंबरला होणार आहे. ही परेड रद्द करण्यात आलेली नाही.

2025 मध्ये आतापर्यंत 350 पेक्षा जास्त मास शूटिंगच्या घटना

15 नोव्हेंबर 2025 रोजी नेवाडाच्या हेंडरसनमध्ये भयानक रोड रेजची घटना घडली होती. यात 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. जेकब एडम्स शाळेत चाललेला. त्यावेळी दोन ड्रायव्हरमध्ये भांडणं झालं. एकाने गोळीबार केला. यात जेकबचा मृत्यू झाला. अमेरिकेत 2025 मध्ये आतापर्यंत 350 पेक्षा जास्त मास शूटिंगच्या घटना घडल्या आहेत. यात 316 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.