America Manta Ray : समुद्राच्या पोटातील अमेरिकेची नवीन शक्ती ‘मंटा रे’, चीन-रशियासह सगळेच देश टेन्शनमध्ये
America Manta Ray : अमेरिकेने एक नवीन अस्त्र विकसित केलय. त्यामुळे जगातील बहुतांश देश टेन्शनमध्ये आले आहेत. समुद्राच्या पोटातील अमेरिकेची ही नवीन शक्ती आहे. काही दिवसांपूर्वी सॅटलाइट फोटो समोर आल्यानंतर अचानक मंटा रे गायब झालं.

काही दिवसांपूर्वी अमेरिकन नौदलाच ‘मंटा रे’ सॅटलाइट फोटोंमुळे कॅलिफोर्नियाच्या पोर्ट ह्यूनेमे नौदल तळावर दिसलं होतं. सोशल मीडियावर ‘मंटा रे’ चा फोटो व्हायरल होताच ते गायब झालं. त्याठिकाणी अन्य नौका दिसू लागल्या. अमेरिकन नौदल काहीतरी मोठ करणार अशी चर्चा सुरु झालीय. सर्वप्रथम हे ‘मंटा रे’ हे काय आहे ते समजून घ्या. अमेरिकेने ज्या प्रमाणे प्रीडीएटर ड्रोन विकसित केलं, तसच त्यांनी ‘मंटा रे’ नावाच की अंडरवाटर ड्रोन विकसित केलय.
समुद्राच्या पोटात माणसाला जिथे पोहोचण शक्य नाहीय, तिथपर्यंत हे मंटा रे ड्रोन जाऊ शकतं. हे एक मानवरहीत अंडरवॉटर ड्रोन आहे. अमेरिकन नौदल या अंडरवॉटर ड्रोनचा वापर हेरगिरी, रिसर्च, शोध आणि अन्य आवश्यक कामांसाठी करु शकते. या आधी मंटा रे चे काही फोटो व्हायरल झाले होते. हे मंटा रे ड्रोन आकारमानाने किती मोठ आहे? नेमक कसं आहे? या बद्दल आताच काही अंदाज वर्तवण शक्य नाहीय. DARPA ने सांगितलय की, आकार मोठा असला, तरी सहजतेने हे ड्रोन एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर पाठवल जाऊ शकतं.
अमेरिकेला प्रशांत महासागरात सर्वात मोठा धोका चीनपासून
अमेरिकन नौदल मागच्या काही महिन्यांपासून मंटा रे ड्रोनच परीक्षण करतेय. अजूनपर्यंत या ड्रोनचा सेवेत समावेश केलेला नाही. अमेरिकेने ज्या पद्धतीच ड्रोन टेक्निक विकसित केलय, त्यामागे चीन-रशियाच्या पाणबुड्यांचा सामना करण हा उद्देश आहे. युक्रेन बरोबर युद्ध सुरु असताना रशिया सुद्धा पाण्याखाली ड्रोन विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. माहितीनुसार, रशियन ड्रोनची रेंज 6,200 मैल आहे. ते अण्वस्त्रांनी सुसज्ज असू शकतं. 100 नॉट (115 मैल प्रति तास) वेग असू शकतो. अमेरिकच मंटा रे ड्रोन रशियन ड्रोन पेक्षा घातक ठरु शकतं. अमेरिकेला प्रशांत महासागरात सर्वात मोठा धोका चीनपासून आहे. एका रिपोर्ट्नुसार चीन सुद्धा UUVs बनवण्याच्या मागे लागला आहे.
काय आहे मंटा रे ची खासियत ?
मंटा रे एक अंडरवॉटर ड्रोन आहे. नॉर्थ्रॉप ग्रुम्मनने अमेरिकी नौदलासाठी हे ड्रोन डिजाइन केलय. या ड्रोनच नाव कार्टिलेजिनस माशाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. समुद्री मासा मांटा रे वरुन डिझाइन बनवली आहे. हे एक सबमरीन ड्रोन आहे. इंधनाशिवाय बराच काळ समुद्रात राहण्याची या ड्रोनची क्षमता आहे. त्या शिवाय या ड्रोनमध्ये असे सेंसर आहेत, समुद्राच्या आत असलेला धोका लगेच कळून येऊ शकतो. मंटा रे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. मंटा रे पूर्णपणे ऑटोनॉमस आहे. यात अनेक प्रकारचे पेलोड लावून मिशनवर पाठवता येऊ शकतं.
