UFO-Alien: चमकदार गोलचकती… कित्येक किलोमीटरच्या पाठलागाचा थरार…एलियन खरंच असतात? ट्रम्प यांचा दाव्याने जग….
US UFO Files: एलियन आहेत की नाही. UFO असतात का> याविषयी अमेरिकेने सर्वात मोठे पुरावे दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सरकारने याविषयीच्या सीक्रेट फाईल्स उघड केल्या आहेत. काय आहे त्यातील सत्य?

US UFO Files: एलियन आहेत की नाही, युएफओ याविषयी युरोप, अमिरेका आणि जगात एकूणच मोठे गूढ आहे. त्याविषयीच्या अनेक कथा आणि पटकथा आहेत. अनेकांनी युएफओ पाहिल्याचा दावा केला आहे. तर काहींनी एलियन्स पाहिल्याचा दावा केला आहे. बर्म्युडा ट्रँगल्सवर तर चित्रपट तयार झाले आहेत. आता अमेरिकन सरकारने पहिल्यांदाच याविषयीची माहिती सार्वजनिक केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर याविषयीच्या सीक्रेट फाईल्स उघड करण्यात आल्या आहेत. काय आहे त्या फाईल्समध्ये?
खरंच एलियन असतात?
Aliens आणि UFO विषयीच्या फाईल्स शुक्रवारी सार्वजनिक करण्यात आल्या. त्यामुळे याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. या फाईल्समध्ये अमेरिकन सैन्याने गोपनीय मेमो, अपोलो मिशनसंबंधित रेकॉर्ड तर त्या लोकांची अधिकृत वक्तव्य सार्वजनिक केली आहे, ज्यांनी युएफओ उडताना पाहिल्याचा आणि एलियन पाहिल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे ही काही सामान्य लोकं नाहीत. तर यामध्ये शास्त्रज्ञ आणि बड्या लोकांचा समावेश आहे. पृथ्वीबाहेर एक संस्कृती असल्याचा दावा करण्यात येत आहे.
FBI चा अहवाल सार्वजनिक
1957 मधील एफबीआयचा एक अहवालही सार्वजनिक करण्यात आला आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जमिनीवरून आकाशात उडणारी एक विशाल चमकती गोलाकार चकती त्यांनी पाहिले. तर 2023 मध्ये काही अमेरिकन नागरिकांनी आकाशात अगदी स्थिर अशी धातूची फिरणारी चकती पाहिली. ती कितीतरी वेळ आकाशात स्थिर होती असा दावा करण्यात आला होता. त्याविषयीचा घटनाक्रम सार्वजनिक करण्यात आला आहे.
इतकेच नाही तर 2022 मध्ये मध्य-पूर्व देशात, इराक, सीरीया आणि युएईच्या आकाशातही अशाच प्रकारच्या गोल चकाकणाऱ्या चकत्या पाहण्यात आल्या. अमेरिकन लष्कराने त्यांना अनआयडेटिफाईड एनोमलस फिनॉमिना या श्रेणीत ठेवले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आला आहे. त्यात एक गोलाकार वस्तू अत्यंत वेगाने सुसाट गेल्याचे दिसते. काही तज्ज्ञांच्या मते ती मिसाईल असू सकते. पण तिचा आकार पाहता त्यावर कुणाचाच विश्वास नाही.
अपोलो मिशनमध्ये पाठलाग
तर सार्वजनिक दस्तावेजात एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार अपोलो 11, अपोलो 12 आणि अपोलो 17 मिशन अतंर्गत अंतराळ गेलेल्या अंतराळवीरांचे अनुभव समोर आले आहेत. ते गेल्या कित्येक दिवसांपासून गोपनीय ठेवण्यात आले होते. अपोलो 11 मिशनअंतर्गत बज एल्ड्रिन हे अंतराळवीर होते. 1969 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी चंद्र मोहिमेदरम्यान एक अत्यंत चमकदार वस्तू त्यांच्या मागोमाग येत असल्याचे त्यांना जाणवले. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. पण त्यांनी या वस्तूचे निरीक्षण केले असता ती अंतराळातील वस्तू जाणवली नाही. तर एलियन आणि युएफओविषयी लोकांना माहिती घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सीक्रेट फाईलमधील माहिती सार्वजनिक करा असे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत.