भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका, 30 टक्के टॅरिफमुळे ट्रम्प यांची उडाली झोप; मोठी अपडेट समोर!

भारताने लावलेल्या 30 टक्के टॅरिफमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे. दोन खासदारांनी ट्रम्प यांना थेट पत्र लिहिले आहे.

भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका, 30 टक्के टॅरिफमुळे ट्रम्प यांची उडाली झोप; मोठी अपडेट समोर!
donald trump and narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 18, 2026 | 12:58 PM

India Tariffs On America : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. अजूनही हा टॅरिफ कमी झालेला नाही. व्यापारविषयक तूट भरून काढण्यासाठी तसेच भारताचा रशियासोबतचा तेल खरेदीचा व्यापार कमी व्हावा यासाठी ट्रम्प यांनी भारतावर हा टॅरिफ लागू केलेला आहे. असे असतानाच आता भारताने अमेरिकेविरोधात लावलेल्या 30 टक्के टॅरिफची जगात चर्चा होत आहे. या टॅरिफमुळे अमेरिकेची झोप उडाली आहे. अमेरिकेच्या दोन खासदारांनी या टॅरिफविरोधात थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मोठे मागणी केलेली आहे.

दोन खासदारांनी लिहिले आहे पत्र

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारतानेही अमेरिकेतून भारतात आयात होणाऱ्या डाळींवर 30 टक्के टॅरिफ लावलेला आहे. हा टॅरिफ 30 ऑक्टोबर 2025 रोजीपासून लागू आहे. भारताने लावलेल्या याच टॅरिफवर अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. अमेरिकेतील नॉर्थ डकोटाचे खासदार केव्हिन क्रेमर आणि मोंटाना येथील खासदार स्विव्ह डेन्स या दोघांनी ट्रम्प यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात भारताने अमेरिकेवरील हा टॅरिफ काढून टाकावा, अमेरिकेने तशी मागणी करावी, असे या पत्रात म्हणण्यात आलेले आहे.

चना डाळ, मसूर डाळ, मटर अशा डाळींची हेते निर्णय

भारताने लागू केलेल्या या टॅरिफमुळे अमेरिकेतील डाळ उत्पादक शेतकऱ्यांना तसेच डाळ उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे, असे या खासदारांचे मत आहे. अमेरिकेतून चना डाळ, मसूर डाळ, मटर अशा डाळींची भारतात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. भारत हा डाळींची मोठी बाजारपेठ आहे, असे या खासदारांनी ट्रम्प यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसच भारताने अमेरिकेवर डाळ निर्यातीसाठी 30 टक्के लावलेले आयातशुल्क हटवावे असेही या खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

भविष्यात नेमकं काय होणार?

दरम्यान, अमेरिकन खासदारांनी केलेल्या या पत्रव्यवहारामुळे डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अमेरिका फस्ट या धोरणाचा स्वीकार करून ट्रम्प यांनी भारतासह इतरही काही देशावर मोठा टॅरिफ लागू केलेला आहे. असे असतानाच आता भारताने अमेरिकेवर लागू केलेल्या या 30 टक्के टॅरिफचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.