याचे समर्थन होऊच शकत नाही.. भारताने थेट सुनावले अमेरिकेला, 3 भारतीयांच्या मृत्यू प्रकरणात..

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावात आल्याचे बघायला मिळत आहे. ओमानच्या आखातात भारतीय जहाजांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. ज्यानंतर आता भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे.

याचे समर्थन होऊच शकत नाही.. भारताने थेट सुनावले अमेरिकेला, 3 भारतीयांच्या मृत्यू प्रकरणात..
S. Jaishankar and Marco Rubio
| Updated on: Jun 13, 2026 | 8:09 AM

मध्य पूर्वेत प्रचंड तणाव वाढला. दोन ते तीन दिवसांपूर्वी ओमान खाडीत अमेरिका आक्रमक झाली. दिसेल त्या जहाजावर हल्ले केले जात होते. 20 भारतीय असलेल्या जहाजावरही अमेरिकेच्या लष्कराने हल्ला केला. यासोबतच एका भारतीय जहाजावर मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला. भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर मोठे हल्ले केले जात आहेत. ओमानच्या आखातात भारतीय कर्मचारी असलेल्या तेलवाहू जहाजावर हल्ले झाली. त्यामध्येच तब्बल 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. ज्याने एकच खळबळ उडाली. इराण आणि अमेरिका युद्धात भारताची स्पष्ट भूमिका आहे. युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, ही भारताची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. मात्र, ओमानच्या आखातात भारतीय जहाजांवरही हल्ले केले जात आहे. यादरम्यानच आता भारत याविरोधात आक्रमक झाला.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या घटनांवरून भारताने नाराजी व्यक्त केली. व्यापारी जहाजांवरील अशा प्रकारच्या जीवघेण्या लष्करी कारवाईला कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थन केले जाऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. भारताने राजनैतिक पातळीवरही कठोर भूमिका घेतली आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात दूरपर्यंत भारताचे काही नाही. मात्र, तरीही अशाप्रकारची हल्ले केली जात आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केली आहे. अमेरिकन नौदलाच्या कारवाईत 3 भारतीय खलाशांचा मृत्यू  प्रकरणात या घटनेचा भारताने निषेध केला.

काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध अगोदरच तणावात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून भारत महान देश असल्याचे सांगतात. मात्र, भारताविरोधात कायम कारवाई करताना दिसतात. काही महिन्यापूर्वीच भारतावर मोठा टॅरिफ त्यांनी लावला. त्यामध्येच आता इराणसोबतच्या युद्धात भारतीय जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संबंध ताणत आहेत.

Follow Us