सुषमा स्वराज यांची जागा घेणारे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर कोण आहेत?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याशिवाय इतर 57 मंत्र्यांनीही शपथ घेतली. मात्र या 57 मंत्र्यांमध्ये सुषमा स्वराज यांचा समावेश नव्हता. सुषमा स्वराज सांभाळत असलेल्या परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी यावेळी एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. सोबतच स्वराज यांची मंत्रीमंडळातील जागा घेणारे जयशंकर कोण असाही प्रश्न अनेकांना पडला. …

सुषमा स्वराज यांची जागा घेणारे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर कोण आहेत?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याशिवाय इतर 57 मंत्र्यांनीही शपथ घेतली. मात्र या 57 मंत्र्यांमध्ये सुषमा स्वराज यांचा समावेश नव्हता. सुषमा स्वराज सांभाळत असलेल्या परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी यावेळी एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. सोबतच स्वराज यांची मंत्रीमंडळातील जागा घेणारे जयशंकर कोण असाही प्रश्न अनेकांना पडला.

एस. जयशंकर हे 2015 ते 2018 दरम्यान भारताचे माजी परराष्ट्र सचिव राहिले आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवल्याने ते राज्यसभेतून मंत्री होतील. जयशंकर परराष्ट्र असताना भारतासाठी परराष्ट्र खात्यातील अनेक घटना महत्त्वपूर्ण ठरल्या. विशेषतः डोकलाम प्रश्नावर तोडगा काढताना जयशंकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. फक्त मोदी सरकारच्या काळातच नाही, तर आधीच्या सरकारांच्या काळातही जयशंकर यांचे काम चांगले राहिले. भारत-अमेरिकेत झालेल्या ऐतिहासिक अणु कराराच्यावेळी जयशंकर भारतीय समितीचे सदस्य होते. या कराराची सुरुवात 2005 मध्ये झाली आणि 2007 मध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारच्या काळात हा करार पूर्ण झाला.

मोदी मंत्रीमंडळात JNU मधून शिक्षण घेणारे 2 मंत्री

15 जानेवारी 1955 रोजी दिल्लीत जन्म झालेल्या एस. जयशंकर यांचे वडील स्वतः भारतीय रणनीतिकार होते. जयशंकर यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर एम. फिल आणि पीएचडी जेएनयूमधून (JNU) पूर्ण केली. अशाप्रकारे यावेळच्या मोदी मंत्रीमंडळात जेएनयूमधून शिक्षण घेणारे 2 मंत्री आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही जेएनयूमधूनच अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

जयशंकर 1977 बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी अनेक संघर्षाच्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. लडाखमधील दीपसांगमध्ये घुसखोरी आणि डोकलाम हे यापैकीच दोन विषय. या दोन्ही वेळी भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर आले होते. तसेच दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अशावेळी जयशंकर यांनीच चर्चेचे मार्ग खुले करत तणाव कमी करण्यात भूमिका केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *