AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत हाहाकार! इराणकडून रचला जातोय जगाची झोप उडवणारा कट, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या..

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. त्यामध्येच आता धक्कादायक आणि जगाची झोप उडवणारी माहिती पुढे येतंय. इराणकडून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट हा रचला जात असल्याचे सांगितले जात आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोठे भाष्य केले.

अमेरिकेत हाहाकार! इराणकडून रचला जातोय जगाची झोप उडवणारा कट, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या..
Donald Trump
| Updated on: Jul 10, 2026 | 8:59 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. त्यामध्येच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अमेरिकेच्या मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायलने अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती दिली. यामध्ये दावा करण्यात आला की, इराणकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याबाबत कट रचला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही माहिती अशावेळी आली, ज्यावेळी दोन दिवसांमधील तणाव वाढला आहे. इस्त्रायलच्या गुप्तचर एजन्सीने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना इशारा देत डोनाल्ड ट्रम्प यांना निशाना बनवण्याचा कट इराणकडून आखला जात असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही यावर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने काही भाष्य केले नाही. रिपोर्टनुसार, 2020 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्स चे फोर्स कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण सतत डोनाल्ड ट्रम्प यांचा बदल घेण्याबद्दल बोलत आहे.

हेच नाही तर सर्वाेच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेवेळीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हेच नाही तर खुल्या मंचावर डोनाल्ड ट्रम्प यांना संपवण्याबाबत बोलण्यात आले.डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव इराणकडून हीट लिस्टवर आहे. इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना संपवायचे आहे. तसे भाष्य त्यांच्याकडून वारंवार केले जातंय. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी इराणच्या हिट लिस्टवर आहे.

ते अमेरिकेचे नेते म्हणजेच मला संपू इच्छितात. मी आज सकाळीच बघितले की, मी त्यांच्या प्रत्येक यादीत आहे. आतापर्यंत तरी मी भाग्यशाली आहे. हा पण नेहमीच असे होऊ शकत नाही. दुसरीकडे यादरम्यानच अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा बंद झाली. दोन्ही देश युद्धविरामाच्या जवळ असताना यांच्यातील तणाव हा अधिक वाढला.

होर्मुज खाडीत अचानक दोन जहाजांवर मोठा हल्ला करण्यात आला. त्यानंतर अमेरिकेने थेट इराणच्या काही भागात मोठे बॉम्ब हल्ले केले. थेट रेल्वे ब्रिजही उडवला. इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाने जग तणावात आले. कारण दोन्ही देशातील तणाव वाढताच लगेचच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसल्या.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे