आणखी एका शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याने खळबळ, अधिकाऱ्यांनी कांड केल्याने मोठी अडचण!
देशभरात सगळीकडे जल्लोष केला जात आहे. दरम्यान, देशात सध्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आणखी एका शिक्षणमंत्र्याने राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

Australia Education Minister Resignation : नीट पेपर परीक्षेत झालेल्य घोटाळ्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा म्हणजे मोदी सरकारला मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश आले आहे. देशभरात सगळीकडे जल्लोष केला जात आहे. दरम्यान, देशात सध्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आणखी एका शिक्षणमंत्र्याने राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी अर्थात ACT च्या शिक्षणमंत्री यवेट बेरी यांनी आपल्या शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते. तसेच तेथे कोणताही पेपर लीक झालेला नव्हता तरीदेखील बेरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याच खात्यातील दोन अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे.
अधिकाऱ्यांचा भ्रष्टाराच नडला
बेरी यांच्याकडे ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरीचे शिक्षणमंत्रिपद होते. त्या त्या भागाच्या उपमुख्यमंत्रिदेखील होत्या. त्यांनीच आपल्या पदाचा स्वत:हून राजीनामा दिला आहे. त्यांच्या खात्यातील दोन वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सापडले. या अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला आहे. माझ्या खात्यातील अधिकाऱ्यांची जबाबदारी माझीच आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्याची जबाबदारीही मी स्वीकारायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
भ्रष्टाचाराचे प्रकरण कसे समोर आले?
दरम्यान, एसीटीच्या इंटिग्रीटी कमिनशनने एक धक्कादायक रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टनुसार एसीटीच्या शिक्षण खात्यात काम करणाऱ्या दोन बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. त्यांनी टेंडरचे वितरणा ते शासकीय निधीचा वापर इथंपर्यंत अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. या अधिकाऱ्यांचे कृत्य म्हणजे दुसरा भ्रष्टाचारच आहे, असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियात एकच खळबळ उडाली आणि आता बेरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.