
अमेरिकेच्या इशाऱ्यावर बांगलादेश काम करत असल्याचं दिसत आहे. मोहम्मद युनूस आधी भारताविरुद्ध बरळे हेते. त्यांनी त्यांच्याच सरकारवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. आता हेच युनूस सरकार म्यानमारच्या विरोधात अमेरिकेसाठी काम करणार असल्यासचं दिसत आहे.
शेजारच्या म्यानमारमध्ये चार वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी युद्धात उतरण्याची तयारी बांगलादेशचे लष्कर करत आहे. बांगलादेशचा म्यानमारमध्ये प्रवेश हा रखाइन प्रांतातील लष्करी कारवाईत अराकान आर्मीला रसद आणि पुरवठा सहाय्य पुरवण्याच्या अमेरिकेच्या योजनेचा एक भाग आहे.
अमेरिकेची कठपुतळी मोहम्मद युनूस यांनी या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. रामू येथील बांगलादेश लष्कराची दहावी डिव्हिजन या मोहिमेचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. बांगलादेशचे नवनियुक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) खलिलुर रहमान यांनी दहाव्या डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतली आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीला जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल मोहम्मद असदुल्लाह मिन्हाजुल आलम देखील उपस्थित होते.
खलिलुर रहमान हे रोहिंग्या समस्येचे उच्च प्रतिनिधी आणि प्राधान्य विषयक मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आहेत. सूत्रांच्या हवाल्याने नॉर्थ ईस्ट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेश लष्कराच्या 17 व्या आणि 24 व्या डिव्हिजनदेखील या ऑपरेशनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.
म्यानमारसाठी बांगलादेशची योजना
म्यानमारच्या रखाइनमध्ये लष्करी सामग्री पोहोचवण्याच्या हेतूने बांगलादेशच्या लष्कराने टेकनाफजवळ एक भव्य सुविधा उभारण्याचे काम सुरू केले आहे. सिल्खली लष्करी तळाजवळ उभारण्यात येणाऱ्या या केंद्रात साहित्य आणि इतर साहित्य हलविण्याचे नियोजन आहे.
म्यानमारच्या लष्करी जुंटाविरोधात अमेरिकेच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या युद्धाचा एक भाग म्हणून युतीचे सैन्य याचा वापर करणार आहे. अराकान आर्मीचे रखाइन प्रांताच्या मोठ्या भागावर नियंत्रण आहे आणि जुंटा केवळ तीन शहरांपर्यंत मर्यादित झाला आहे.
अराकान आर्मी लवकरच कारवाई करू शकते
अमेरिकेच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत अराकान आर्मी आता लवकरच राज्यातील उर्वरित भाग ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाई सुरू करू शकते. या कारवाईसाठी अमेरिकेचे अधिकारी बांगलादेशात तैनात असून विविध भागांना भेटी देत आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या तीन अधिकाऱ्यांसह एका मोठ्या पथकाने चटगांव हिल ट्रॅक्स आणि कॉक्स बझारला शांतपणे भेट देणे हा या योजनेचा एक भाग होता, जो 16 एप्रिल रोजी ढाक्यात दाखल झाला. अराकान आर्मीच्या नव्या ऑपरेशनदरम्यान लष्करी रसद पुरवठ्यासाठी ही क्षेत्रे महत्त्वाची ठिकाणे असतील.