इरान, इस्रायल युद्ध सुरू असतानाच कंगाल बांग्लादेशला बंपर लॉटरी, झाला मालामाल

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, मध्यपूर्वेमधील तणाव वाढतच चालला आहे, इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असतानाच आता बांग्लादेशसाठी एक खूशखबर आहे.

इरान, इस्रायल युद्ध सुरू असतानाच कंगाल बांग्लादेशला बंपर लॉटरी, झाला मालामाल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 6:06 PM

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, मध्यपूर्वेमधील तणाव वाढतच चालला आहे, इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असतानाच आता बांग्लादेशसाठी एक खूशखबर आहे. बाग्लादेशला तब्बल 1.29 लाख कोटी रुपयांची भेट मिळाली आहे. वर्ल्ड बँक आणि एडीबी म्हणजेच आशियाई विकास बँकेकडून बाग्लादेशला हे अर्थसहाय्य करण्यात आलं आहे.

एका मिडिया रिपोर्टनुसार बँकिंग क्षेत्रात सुधारणा, हवामान बदलांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच इतर विकास प्रकल्पांना मदत म्हणून वर्ल्ड बँक आणि आशियाई विकास बँकेकडून बाग्लादेशला 1.29 लाख कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार एडीबीकडून बांग्लादेशला 90 कोटी डॉलरच कर्ज मंजूर करण्यात आलं आहे, ज्यामधील 50 कोटी डॉलर हे बँकिंग क्षेत्रातील सुधारणासाठी खर्च करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत 40 कोटी डॉलर हे हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि सुधारणा कार्यक्रमावर खर्च करण्यात येणार आहेत. एडीबीकडून देखील यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बाग्लादेशला आर्थिक मदत करण्यात आली आहे. या कर्जापैकी 50 कोटी डॉलर बांग्लादेशमधील बँकिंग क्षेत्रावर खर्च होणार असल्याचं एडीबीने म्हटलं आहे.

यासोबतच एडीबीनं हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बांग्लादेशला 40 कोटी डॉलरचं कर्ज मंजूर केलं आहे. पहिल्या टप्प्यात बाग्लादेशला पन्नास कोटी डॉलरचं कर्ज देण्यात येणार आहे. त्याचा उपयोग हा बँकिंग क्षेत्रातील सुधारणासाठी केला जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये चाळीस कोटी डॉलरचं कर्ज दिलं जाणार आहे, ज्याचा उपयोग हा हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी केला जाणार आहे. दुसरीकडे वर्ल्ड बँकेनं देखील बाग्लादेशला तब्बल 64 कोटी डॉलरचं कर्ज मंजूर केलं आहे, वर्ल्ड बँक आणि आशियाई बँक मिळून आता बाग्लादेशला तब्बल 1.29 लाख कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बाग्लादेशमध्ये सध्या मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे, अनेक समस्या आहेत, त्यातच आता आर्थिक मदत मिळाल्यानं मोठी लॉटरी लागली आहे.