भारताकडे मागितली भीक, आता पाकिस्तानसोबत जात आहे हा देश, मोठ्या कराराची तयारी..
बांगलादेश डबल डाव खेळताना दिसत आहे. भारतासोबत चांगले नाते ठेवत असल्याचे दाखवले जात आहे, तर दुसरीकडे भारताविरोधात भूमिका घेतली जात आहे. त्यातच आता बांगलादेशाने मोठी इच्छा व्यक्त केली.

बांगलादेश भारताच्या मागून काट्या करताना दिसतोय. एकीकडे तोंडावर गोड बोलायचे तर मागून काट्या करायचे असे काम बांगलादेशचे सुरू आहे. बांगलादेशने पाकिस्तान, साैदी अरेबिया आणि तुर्की यांच्यासोबत इस्लामिक नाटोमध्ये सहभागी होण्यास तयार असल्याचे म्हटले. पण देशाच्या फायद्यासाठी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले. 7 ऑगस्टला मक्का करार झाला. तीन देशांनी हा संरक्षण करार केला. या कराराचा अर्थ असा की, कोणत्याही एका देशावर हल्ला म्हणजे तीन देशांवर समजला जाईल. बांगलादेशचे मंत्री हुमायूं कबीर यांनी म्हटले की, वैश्विक परिस्थितीत बदलणारी अर्थव्यवस्था लक्षात घेता साैदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की यांच्यासोबत सहभागी होणे सकारात्मक दिसत आहे. बीएसएसच्या बांगला सेवामध्ये बोलताना त्यांनी म्हटले की, बांग्लादेश प्रथम संतुलित विदेश नीती पुढे आहे.
ज्यात देशाचे हित सर्वात अगोदर ठेवले जाईल. ढाका संरक्षण कराराबद्दल विचार करत आहे. ढाका या संरक्षण करारात सहभागी होऊ शकतो. व्दिपक्षीय संबंध मजबूत करण्यावर आमचा भर असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. पंतप्रधान तारिक रहमान यांना साैदी अरेबियाच्या मोहम्मद बिन सलमान यांनी आमंत्रित केले आहे.
यापूर्वी ज्यावेळी बांगलादेशला या कराराबद्दल विचारले असताना त्यांनी म्हटले होते की, आम्ही कोणत्याही संरक्षण करारात सहभागी होणार नाहीत. पण आता त्यांची भाषा बदलताना दिसत आहे. आता बांगलादेश म्हणत आहे की, आम्ही बांगलादेशच्या नागरिकांच्या हितामध्ये निर्णय घेणार आहोत. भारतासोबत आम्हाला नाते चांगलेच ठेवायची आहेत. आम्हाला भारतासोबत वाद नको आहे, असे वारंवार सांगताना बांगलादेश दिसतोय.
बांगलादेशला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतासोबत जल करार करायचा आहे. गेल्या काही दिवसांचा विचार केला असता भारत आणि बांगलादेशचे संबंध तणावात आहेत. हिंदुंवर मोठे अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहेत. हेच नाही तर भारतीय दुतावासावरही हल्ला करण्यात आला. त्यातच बांगलादेशला भारतासोबत जल करार करायचा आहे. या संरक्षण करार सहभागी होण्याची इच्छा बांगलादेशने बोलून दाखवली आहे.